24 C
Latur
Monday, September 26, 2022
Homeसोलापूरपत्नीचा छळ, पतीसह सहा जणांविरूध्द गुन्हा

पत्नीचा छळ, पतीसह सहा जणांविरूध्द गुन्हा

एकमत ऑनलाईन

सोलापूर : माहेरून पैसे आणण्यासाठी एका मुलाला स्वत:च्या ताब्यात घेऊन पत्नीला घरातून हाकलून दिल्याप्रकरणी पतीसह सहा जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनीता संजय चौधरी (वय ३२, रा. कोनापुरे चाळ) यांनी फिर्याद दिली आहे.

पती संजय चौधरी, सासू नंदा चौधरी, नणंद सुलोचना पट्टेलू, संतोषी बडे, नवे गणेश बडे, सुवर्ण रेडेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सुनीता यांचे पती संजय याच्यासोबत २०१८ मध्ये झाला होता. त्यानंतर लग्नात मानपान केला नाही असे म्हणत वरील आरोपी हे त्रास देत होते. शिवाय फोटोग्राफर व्यवसायासाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्यासाठी मानसिक त्रास देत होते. त्यानंतर पहिल्या मुलास आरोपींकडे ठेवून घेत, दुस-या मुलास आपल्याबरोबर पाठवून आपल्याला मुलांपासून वंचित ठेवून त्रास दिला, अशा आशयाची फिर्याद सुनीता चौधरी यांनी दिली आहे. तपास महिला पोलीस नाईक वाघमोडे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या