18.5 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeसोलापूरपंढरपुरात ऊस वाहतूकदारांचा ट्रॅक्टर मोर्चा

पंढरपुरात ऊस वाहतूकदारांचा ट्रॅक्टर मोर्चा

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : ऊस वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. यावेळी ऊस वाहतूक दर वाढीसह ऊस वाहतूकदारांच्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनास देण्यात आले. या आंदोलनात जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांच्यासह ऊस वाहतूकदार शेकडो ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले आहेत. या आंदोलनास शिवसेनेचे नेते संजय कोकाटे यांनी उपस्थित राहून पांिठबा दिला.

ऊस वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर मोर्चा मंगळवारी येथील तहसील कार्यालयावर शेकडो ट्रॅक्टरसह धडकला आणि मुसळधार पावसातहि ऊस वाहतूकदारांच्या मागण्यांबाबत विचार होईपर्यंत पंढरपूर तहसील समोर आंदोलन सुरूच राहणार असल्याचा उपस्थित आंदोलनकर्त्यांनी प्रशासनास इशारा देऊन ठिय्या मारला .

यावेळी जनशक्ती शेतकरी संघटनेचे अतुल खूपसे पाटील म्हणाले की महाविकास आघाडी सरकारला आमच्या व्यथा सांगण्यासाठी विठ्ठलाचे दर्शन घेऊन विठ्ठलाला महाविकास आघाडीला वाहतूकदारांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची सुबुद्धी द्यावी असे साकडे घालण्यात आले असून सदर ट्रॅक्टर मोर्चा प्रशासनाकडून जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत सुरूच राहणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. या आंदोलनात सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे,उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यासह अनेक भागातील ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर वाहतूकदार शेतकरी सहभागी झाले आहेत.

या ट्रॅक्टर मोर्चास के.बी. पी कॉलेज पासून सुरुवात करण्यात येऊन पंढरपूर शहरातील प्रमुख मार्गावरून सदर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आली. यामुळे शहरात अधिक काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यानंतर सदर ट्रॅक्टर मोर्चा हा पंढरपूर तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी उपस्थित शेतकरी ऊस वाहतूकदार यांनी शेतक-यांविषयी विविध समस्या मांडल्या. यावेळी उपस्थित शेतक-यांनी जोपर्यंत प्रशासन निर्णय घेणार नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करणार असल्याची भूमिका घेतल्याने पावसातही पंढरपूर तहसील समोर ट्रॅक्टर लावून आंदोलन सुरू होते.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या