27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeसोलापूरट्रॅक्टर, पिकअप अन् बुलेट चोरणारे जेरबंद

ट्रॅक्टर, पिकअप अन् बुलेट चोरणारे जेरबंद

एकमत ऑनलाईन

मोहोळ : वाहनांची चोरी करून ते विक्री करणाऱ्या तिघांना मोहोळ पोलिसांनी जेरबंद केले आहे. सतिश शहाजी खाडेकर( रा . वडणेर , ता , परंडा ), विशाल संभाजी मेरड व विशाल लक्ष्मण खळबट ( दोघेही रा . उंडेगाव , ता . बार्शी ) यांचा त्यात समावेश आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन ट्रॅक्टर, दोन पिकअप व एक बुलेट असा एकूण २५ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, करमाळा व भूम, माढा आणि मुरुड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तीन ट्रॅक्टर , दोन पिकअप चोरीला गेल्याची फिर्याद दाखल झाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा तपास सुरू केला होता. १४ जून रोजी सावळेश्वर परिसरात तीनजण संशयितरित्या फिरताना मोहोळ पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला आढळून आले.

पोलिसांनी त्यांना पकडल्यानंतर त कसून चौकशी केली आणि हा प्रकार समोर आला. न्यायालय त्यांना पोलिस कोठडी ठोठावल्यानंतर पोलिसांनी अधिक त केला आणि वाहनांचा शोध लागला. ही कारवाई पोलिस अधी तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, पो उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक सायकर, पोलिस हवालदार सचिन माने, पोलिस नाईक अमोल घोळवे , प्रविण साठे , सिध्दनाथ मोरे , महिला पोलिस नाईक अनुसया बंडगर , सिध्देश्वर थोरात यांच्या पथकाने केली .

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या