34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeसोलापूरपंढरपूर येथील व्यापा-यांचा बंदला विरोध

पंढरपूर येथील व्यापा-यांचा बंदला विरोध

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : कडक निर्बंध लागण्याच्या नावाखाली व्यापा-यांची गळचेपी केली जात असून कोरोना पेक्षा भूकबळी ने अधिक लोक मरतील अशी संतप्त प्रतिक्रिया पंढरपूर येथील व्यापा-यांनी व्यक्त केली तसेच शासनाचे नियम धुडकावून बुधवारपासून सर्व दुकाने उघडणार असल्याचा इशारा यावेळी येथील व्यापा-यांनी दिला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने लॉक डाऊन न करता कडक निर्बंध लादण्याची जाहीर केले. त्यानुसार शनिवार व रविवारी सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय झाला. मात्र सोमवारी रात्री जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला. यामुळे पंढरपूर सह विविध व्यापार-यांमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या आदेशाला विरोध करण्यासाठी शहरातील सर्व व्यापा-यांनी तातडीची बैठक घेतली माजी नगराध्यक्ष लक्ष्मीनारायण भट्टड यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकी दरम्यान आमदार प्रशांत परिचारक यांना फोन करून व्यापा-यांच्या भावना कळविण्यात आल्या. दरम्यान परिचारक यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्यासह भेट व्यापा-यांच्या बैठकीत हजर झाले.

यावेळी विविध व्यापा-यांनी दुकान बंदी मान्य नसल्याच्या भावना व्यक्त केल्या. यामुळे परिचारक यांनी बैठकी मधून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क केला. फडणवीस यांना पंढरपुरातील व्यापा-यांचे गणित चार वा-यांवर असून वर्षभरात एकही वारी झाली नसल्याने उद्योग ठप्प असल्याचे सांगितले. यावर फडणवीस यांनी देखील आम्ही केवळ शनिवारी आणि रविवारी बंदला पांिठबा दिला होता. असे सांगून व्यापा-यांच्या भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोचविण्याचे आश्वासन दिले.

कोरोनाच्या संकट काळात शेतीच पेटवतेय सर्व सामान्यांची चूल..!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या