सोलापूर : रहदारीला अडथळा निर्माण करत रस्त्यात हातगाड्यांवर फळ, भेळ, आईसक्रीम, उत्तप्पा आदी साहित्य विकणा-या १३ जणांवर शहरातील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले.
विजापूर रोड परिसरात हातगाडीवर फळ विक्री करणा-या जुनेद अब्बास बागवान (३२, रा. विजापूर नाका), चैतन्य भाजी मार्केट येथील सार्वजनिक रोडवर हातगाडीवर भाजी विक्री करणा-या बाळू संजय लोहार (२१, गरिबी हटाव झोपडपट्टी क्र. २), डी मार्टसमोर चायनीज विक्री करणा-या अनिल नामदेव यमगवळी (३२, जुळे सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सराफ बाजार परिसरात हातगाडीवर भेळ विक्री करणा-या अनिल उमाकांत बुरांडे (४४, पश्चिम मंगळवार पेठ), न्यू बुधवार पेठ परिसरात रस्त्यावर वाळू व खडी टाकल्याप्रकरणी सुभाष दाजी माने (६२, न्यू बुधवार पेठ) याच्यावर, क्रांती चौक ते बलिदान चौक दरम्यान हातगाडीवर डोसा-उत्तप्पा विक्री करणा-या विजय श्रीशैल खेड (४१, रा. भवानी पेठ) तसेच त्याच परिसरात हातगाडीवर भजी, वडापाव विक्री करणा-या मंजुनाथ बसप्पा कुपस्त (४२, बुधले गल्ली) यांच्यावर जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
विजापूर वेसमधील हॉटेलजवळ रस्त्यात रिक्षा थांबविल्याप्रकरणी प्रभाकर शंकर शिंगाडे (३५, सलगर वस्ती), रहदारीत हातगाडी उभी केल्याप्रकरणी आमिनसाब मेहबूबसाब कुरेशी (५२, बेगम पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल झाल. चारचाकी उभी करून रस्त्यावर आइसक्रीम विक्री करणा-या राजेंद्र रामचंद्र जाधव (स्टेटमेंट फ्री कॉलनी), खालीद जब्बार सय्यद (४१, मौलाली चौक) अशोक शिवाजी खरात (३८, आम्रपाली चौक), दीपक नागनाथ चलवादी (२१, सात रस्ता), लक्ष्मण हुसेनप्पा वंदिले (४०, मधुकर उपलप वस्ती), रजाक सत्तार शेख (२८, मुरारजी पेठ) या सर्वांवर सदर बाझार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
नीलमनगर ते विनायकनगरकडे जाणा-या रस्त्यात रिक्षा लावून रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी श्रीराम मोहन गेजगे (३०, अमरा) याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.