24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeसोलापूरसमुपदेशनाच्या दोन दिवसापूर्वीच आरोग्य सेवकांच्या बदल्या

समुपदेशनाच्या दोन दिवसापूर्वीच आरोग्य सेवकांच्या बदल्या

एकमत ऑनलाईन

सोलापूर : समुपदेशनाच्या दोन दिवसापुर्वीचा आरोग्य सेवकांच्या बदल्या केल्याची चर्चा जि.प.मुख्यालयात जोर धरली होती.सोयीच्या ठिकाणी पदस्थापना मिळावी यासाठी आरोग्य कर्मचा-यांनी अध्यक्ष अनिरूध्द कांबळे ,उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्याकडे धाव घेतली आहे. तर अर्थ बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी मर्जीतल्या शिपायाची शिफारस केल्याने बदली केल्याचे बोलले जात आहे. बुधवारी जि.प.प्रशासनाच्या वतीने बदलीचा दुसरा टप्पा रात्री उशिरापर्यंत सुरु होता.

आरोग्य विभाग ४३ , प्राथमिक शिक्षण विभाग , बांधकाम विभाग , समाजकल्याण विभाग , पाणी पूरवठा विभागाच्या बदल्या करण्यात आल्या. सकाळ पासूनचं आरोग्य सेवक, सेविका, सहाय्यक, सहाय्यीका यांनी बदलीसाठी गर्दी केली होती.दुपारच्या बाराच्या सुमारास बदली प्रक्रियास सुरुवात झाली , प्रारंभी अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांच्या निजीकक्षात आरोग्य कर्मचारी संघटनेच्या काही पदाधिका-यानी भेट घेत बदलीची शिफारस केली. जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांना आरोग्यसेविकांनी बदलीसाठी घेराव घातला होता.

किरकोळ तक्रारी वगळता बदल्या सुरुळीत पार पडल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. बदल्याचे कामकाज अध्यक्ष अनिरूध्द कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, सभापती मोटे, सीईओ प्रकाश वायचळ यांच्यासह विभाग प्रमूखांच्या उपस्थितीत बदली प्रक्रिया घेण्यात आल्या. प्रशासनाचे कामकाज डेप्यूटी सीईओ परमेश्वर राऊत यांनी पाहीलं. यापूर्वी मंगळवारी ४३ कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

प्रशासकीय १२, विनंत्या ९२ बदल्या
आरोग्य विभाग- विनंती बदल्या ३८, बांधकाम ग्रापापु. प्रशासकीय १ शाखा अभियंता, ८ विनंती, सामान्य प्रशासन- वरिष्ठ कनिष्ठ सहाय्यक प्रशासकीय ९, विनंती कनिष्ठ प्रशासन अधिकारी २, वरिष्ठ सहाय्यक ४, कनिष्ठ सहाय्यक २८, शिपाई ९, शिक्षण विस्तार अधिकारी ३ अशा बदल्या बुधवारी समुपदेशनाद्वारे करण्यात आल्या.

Read More  सेनगावात पाच लाखांचा गुटखा पकडला

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या