27.7 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeसोलापूरघरफोडीसाठी चोरलेल्या कारसह दोन आरोपी लातूरमधून ताब्यात

घरफोडीसाठी चोरलेल्या कारसह दोन आरोपी लातूरमधून ताब्यात

एकमत ऑनलाईन

सोलापूर : उस्मानाबाद येथे घरफोडी करण्यासाठी सोलापूरमधून कार व दुचाकी चोरणा-या दोघांना लातूरमध्ये अटक करण्यात आली आहे. हरजितसिंग टाक व त्याचा साथीदार सुरजितसिंग टाक (रा. हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीला गेलेली एक कार व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतून काही दिवसांपूर्वी एक कार व त्याच दिवशी जोडभावी पेठ पोलिस ठाणे हद्दीत दुचाकी चोरीचा गुन्हा घडला होता. पोलिसांनी दोन्ही घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर कार चोरी करतानावेळी, जोडभावी पेठ पोलिस ठाणे हद्दीतून चोरी केलेली दुचाकी वापरल्याचेफुटेजमध्ये दिसून आले.

त्याचदरम्यान, मोटार सायकल व कारचोरी करणारे दोन इसमांपैकी एक हा आरोपी राज्यातील विविध जिल्ह्यांत घरफोडी, जबरी चोरी दरोडा अशा प्रकारचे गुन्हे करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार हरजितसिंग टाक( रा. सत्तर फुट रस्ता, शेळगी )असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे पोलिसांनी हरजितसिंग टाकचे गुन्हे करण्याचे पद्धतीचा अभ्यास केला. तो कोठेतरी मोठी चोरी अथवा दरोडा टाकणार असल्याचा संशय आल्याने त्याबाबत माहिती घेतली असता, तो लातूर येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी हरजितसिंग वसुरजितसिंग टाक (रा. हडपसर, पुणे) या दोघांना लातूर येथून ताब्यात घेतले.

त्यानंतर त्यांच्याकडून चोरलेली कार वदुचाकी जप्त करण्यात आले. वसध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपींकडे वाहनचोरीबाबत तपास करता, त्यांनी उस्मानाबाद परिसरात घरफोडी करण्यासाठी वाहने चोरी केल्याचे त्यांनी सांगितले, गुन्ह्याचे तपासामध्ये, शहरामधील खासगी तसेच शासकीय सीसीटीव्ही फुटेजची तसेच गोपनीय बातमीदाराची मदत झाली आहे.
ही कामगिरी पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलिस उपआयुक्त डॉ. दीपाली काळे, डॉ. प्रीती टिपरे सहायक पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या