24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeसोलापूरखिडकीचे गज तोडून अडीच टन भंगारसह दोन लाखांचं साहित्य लंपास

खिडकीचे गज तोडून अडीच टन भंगारसह दोन लाखांचं साहित्य लंपास

एकमत ऑनलाईन

सांगोला : बंद यंत्रमाग वीणकर संस्थेच्या खिडकीचे गज तोडून मशिनचे स्पेअरपार्ट, ६९ जुन्या मोटारी, यंत्रमागाचे सुट्टे भंगार, कॉम्प्रेसर असा सुमारे १ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला. सांगोला तालुक्यात सावे येथे सुयोग मागासवर्गीय महिला यंत्रमाग वीणकर औद्योगिक संस्थेमध्ये ही चोरीची घटना ७ मे नंतर घडली. ५ सप्टेंबर २०२२ रोजी ही घटना निदर्शनास आली. याबाबत मनोज नामदेव गावडे (रा. सावे, ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे.

मनोज गावडे यांनी पोलीस पाटील यांना बोलावून फॅक्टरीत पाहणी केली असता खिडकीचा गज तुटलेला दिसला. चोरट्याने फॅक्टरीतील १० हजार रुपये किमतीचे सिमको ७२ मशिनचे स्पेअरपार्ट, ५५ हजारांचे ६३ जुन्या इलेक्ट्रीक मोटारीसह केवल, १५ हजारांच्या ६ जुन्या मोटारीसह केबल १२ हजारांचे कॉम्प्रेसर, १८ हजारांचे ४८ लोखंडी फणी २२ हजारांचे लोखंडी ४८ बीम, २० हजारांचे १५ वायर बंडल, ३५ हजारांचे यंत्रमागाचे सुट्टे भंगार व खटाव मील येथून आणलेले अडीच टन फॅक्टरी भंगार असा सुमारे १ लाख ८७ हजार रुपयेचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार, बामणी-पंढरपूर रस्त्यावर सुयोग मागसवर्गीय महिला यंत्रमाग वीणकर सहकारी औद्योगिक व सावे यंत्रमाग वीणकर औद्योगिक संस्था या दोन संस्था चार वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. संस्थेतील यंत्रमाग साहित्य हे सुयोग मागासवर्गीय महिला यंत्रमाग वीणकर सहकारी औद्योगिक संस्थेत आणून ठेवले होते. दोन्ही मीलची देखरेख मनोज गावडे करतात. दरम्यान, संभाजी देवकते (रा. सावे) यांनी सोमवार, ५ सप्टेंबर रोजी पहाटे ३.२०च्या सुमारास मनोज गावडे यास फोन करून फॅक्टरीमध्ये चोरी झाल्याचे सांगितले. काही लोक फॅक्टरीतील साहित्य (एमएच १० / बीआर ३९८५) घेऊन गेल्याचे सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या