35 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeसोलापूरवाहन चालकास लुटणाऱ्या दोघांना अटक; अकलुज पोलीसांची कारवाई

वाहन चालकास लुटणाऱ्या दोघांना अटक; अकलुज पोलीसांची कारवाई

एकमत ऑनलाईन

अकलूज-येथिल बायपास रोङवरुन जाणाऱ्या टेम्पो चालकास मारहाण व लुटमार करुन पळुन जात असलेल्या दोन लुटारुंना अकलूज पोलीसांनी पाठलाग करुन पकडले. याबाबत सविस्तर माहीती अशी की, दिनांक २०/११/२०२० रोजी सायं ७ वा. चे सुमारास माळीनगर बायपास रोडवरील स्टार बेकरी शेजारी जीया डेअरीकडे जात असलेल्या टेंम्पोस दोन इसम कट मारल्याचा बहाणा करुन टेंम्पो चालकास लुटमार करत असलेबाबत गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक वैभव मारकड, ए. एस. आय. बबन साळुंखे, पोहेको/१०२ संतोष घोगरे, पोहेकॉ/१६२४ मंगेश पवार, पोकॉ/६१७ नितीन लोखंडे यांनी सदर ठिकाणी जाऊन लुटमार करणारे मिरावली लालासो। शेख, रा. यशवंतनगर (देशमुखमळा), राम अशोक सोनवणे रा. यशवंतनगर (शिवतेजनगर) ता. माळशिरस हे पळून जाऊ लागले त्यावेळी पोलीसांनी त्यांचा पाठलाग करुन शिताफीने पकडले असून टेम्पो चालक यांना मारहाण करुन घेतलेली रक्कम त्यांचेकडून जप्त करण्यात आली.

त्यांचेविरुध्द भा.द.वि.सं.क. ३९४, ३४ प्रमाणे गु्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील आरोपी नंबर १ याचेविरुध्द गुर.नं. २७ २०१२ भादविसंक ३९४, ३०२, २०৭, ३४ (सांगली), २) गु.र.नं. १२७/२०१३ भादविसंक ३९९, ४०२ (सांगली) या ठिकाणी गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे.

सदर आरोपीना अटक करण्यात आली असून त्यांनी अशाच प्रकारे अनेक दरोडे
केले असलेबाबत माहिती मिळत असल्याने सदर आरोपीना मा. हु. कोर्टा समक्ष हजर करुन सदर आरोपींची दिनांक २४/११/२०२० रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर असून आणखी गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने गुन्हयाचा पुढील तपास पो.स.ई. दत्तात्रय पुजारी, अकलुज पोलीस ठाणे हे करीत आहेत.

लाचखोरीत भारत ७७व्या स्थानी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या