28.2 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeसोलापूरफ्रुट बीअरची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

फ्रुट बीअरची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

एकमत ऑनलाईन

सोलापूर : बेकायदेशीररित्या फ्रूट बियरची जय जगदंबा चौक ते सात रस्ता परिसरातून वाहतूक करणाऱ्या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडले.
त्यांच्याकडून १ लाख २६ हजार रुपये किमतीचे तीन चाकी गाडीसह मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

यात एकूण ४५ बॉक्स फ्रूट बिअरजप्त करण्यात आले आहेत. सध्या फ्रुट बिअर पिण्याची तरुणाईमध्ये क्रेझ निर्माण झाली आहे. त्याला अटकाव घालण्यासाठी ही कारवाई दुय्यम निरीक्षक देशमुख, निरीक्षक भरारी पथकाचे सुनील पाटील, सुरेश झगडे, चेतन व्हनगुंटी, दीपक वाघमारे यांनी केली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या