27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeसोलापूरविजापूर नाका झोपडपट्टीमध्ये दोघांना काठीने मारहाण

विजापूर नाका झोपडपट्टीमध्ये दोघांना काठीने मारहाण

एकमत ऑनलाईन

सोलापूर : येथील विजापूर नाका झोपडपट्टी नंबर १ मधील आंबेडकरनगरात दोघांना काठीने मारहाण करून जखमी करण्यात आले.

या प्रकरणी राम अंबादास अवघडे (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सूरज मल्लेश यादव, कुलो, पिल्ली व राधा (सर्व रा. आंबेडकरनगर) यांच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व त्याचा मित्र महेश यादव हे फिर्यादीच्या घरी जेवण करत असताना महेश याची पत्नी डबा देण्यासाठी आली होती. त्यावेळी तिला आरोपी राम हा फिर्यादीचे घर दाखवण्याकरता आला. त्यावेळी त्याने विनाकारण फिर्यादीच्या झोपलेल्या आईला शिवीगाळ केली. याबाबत फिर्यादीने विचारणा केली असता, त्याने फिर्यादीस काठीने मारून जखमी केले, त्याचप्रमाणे अन्य आरोपींनीही मारहाण केली. यावेळी फिर्यादीचा भाचा रोहित याला देखील तोंडावर ठोसा मारून ठार मारण्याची धमकी दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या