28.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeसोलापूरसोलापुरात दोघे घरफोडे अटकेत

सोलापुरात दोघे घरफोडे अटकेत

एकमत ऑनलाईन

सोलापूर: कर्नाटकात चोरी, मारामारी, कॉन्ट्रॅक्ट किलिंग, दरोडा असे विविध गंभीर गुन्हे दाखल असलेला चौर दीड वर्षापूर्वी जुळे सोलापुरात राहू लागला. सोलापुरात येऊन वकिलाचेच घर फोडले. ही बाब चौकशीत उघडकीस आली.

दिवसभर रेकी करून रात्री शहरात दहा ठिकाणी चोरी करणा-या दोन चोरांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. चोरीच्या रकमेतून त्याने पाच एकर शेती, तीन प्लॉट, दोन कार, दोन दुचाकी घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

उमेश विठ्ठल खेत्री (वय ३५, रा. इंडी विजापूर, सध्या जुळे सोलापूर), लव सुरेश सासवे ( वय २९, रा. आहेरवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघे रात्री घराबाहेर पडतात, अशी माहिती पोलिसांना कळाली. या माहितीवरून त्यांनी आरोपीची माहिती काढली. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्याने शहरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत दहा गुन्हे केल्याचे कबूल केले.

९ लाख १ हजार ९८० रुपये रोख आणि १३७ ग्राम सोन्याचे दागिने असे एकूण २५ लाख ९३ हजार ३५७ रुपयांचा मुद्देमाल मिळाला. यातील खेत्री याने चोरीच्या पैशातून आपल्या नातेवाईकांच्या नावाने चुंगी येथे तीन एकर आणि संजवाड येथे दोन एकर असे पाच एकर शेतजमीन शिवाय मळेगाव येथे तीन प्लॉट त्याने विकत घेतल्याचे सांगितले. तसेच दोन दुचाकी आणि दोन कार हे त्याने घेतल्याचे सांगितले. ४४ लाख २ हजार रुपये किमतीचे जमीन रोकड, दागिन्यांसह २५ लाख ९३ हजार ३५७ रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या