23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeसोलापूरबार्शीत दोन घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास

बार्शीत दोन घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास

एकमत ऑनलाईन

बार्शी : गाडेगाव रस्त्यावर दोन घरे फोडून चोरट्यांनी कपाटातील रोकडसह तीन लाखांची दागिने पळविली. या घरफोडी गाडेगाव रस्त्यावर धर्माधिकारी प्लॉट येथे २ जुलै रोजी पहाटे झाल्या. याबाबत विष्णू विठ्ठल बारगजे (वय ४३, रा. धर्माधिकारी प्लॉट, बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे.

चोरट्यांनी विष्णू बारगजे यांच्या घरातून ३ तोळे पट्टी गंठण, ७० हजारांचे दोन तोळे गंठण, ७० हजारांचे १ तोळे नेकलेस आणि दोन अंगठ्या, सहा ग्रॅम कर्णफुले, अडीच ग्रॅम सोन्याचे मनी व रोख पाच हजार रुपये पळविले.

तसेच दुसरी फिर्यादी प्रकाश बिराजदार यांनी दिली असून चोरट्यांनी यांच्या घरातून तीन ग्रॅम मनी मंगळसूत्र आणि चांदीचे पैंजण, चांदीच्या जुन्या नाणी असा एकूण तीन लाखांचा ऐवज पळवला.

फिर्यादी बारगजे हे जागे झाले तेव्हा चोरट्यांनी बेडरूमला आतून कडी लावल्याचे लक्षात आले. त्यामुळे घराच्या मागे जाऊन डोकावले असता गज कापलेला दिसला. त्यांनी मुलास आत उतरवून बेडरूमचे दार उघडले. दुसरे साथीदार प्रकाश बिराजदार हेही बेडरूममध्ये झोपले असताना चोरट्यांनी मागील खिडकीचे गज तोडून प्रवेश केला. कपाटातील साहित्य बाहेर फेकून घरातील ऐवज पळविला.

याची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक जनार्धन नालकुल, पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास सहायक पोलीस फौजदार अजित वरपे करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या