सोलापूर: यंत्रमाग कारखानदाराची २ कोटी १४ लाख ८७ हजार रुपये काढून घेत फसवणूक केल्याप्रकरणी दिल्लीतील पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत ज्योती सुनील सारडा (वय ४७, रा. होमकर नगर, भवानी पेठ) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ज्योती सारडा या यंत्रमाग कारखानदार आहेत. सारडा यांच्या नावाने इतर बनावट दस्ताऐवज, डिजिटल सिग्नेचर, प्रमाणपत्र खोटे बनवून ते खरे असल्याचे भासवून
पोर्टलवरून नोंदणी केली आणि त्या माध्यमातून शासकीय योजनेंतर्गत मिळणारे एकूण २ कोटी १४ लाख ८७ हजार ४८० रुपये परवानगी न घेता स्वताच्या फायद्यासाठी वापरली. याबाबत धनंजय प्रसाद ताटे (रा. चांदपूर, पश्चिम दिल्ली), गणेश भिलसिंग गिरासे (रा. सुरत, गुजरात), विकास रमेशचंद (रा. दिल्ली), ब्रिजेशकुमार विनोदभाई काकडिया (रा. सुरत, गुजरात), रौनक प्रकाश गुप्ता (रा. उत्तर प्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.