29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeसोलापूरदोन दिवसाची टाळेबंदी, उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये संमिश्र प्रतिसाद

दोन दिवसाची टाळेबंदी, उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये संमिश्र प्रतिसाद

एकमत ऑनलाईन

उत्तर सोलापूर : राज्य सरकारने करुणा महामारी रोखण्यासाठी आठवड्यातील शेवटचे दोन दिवस शनिवार रविवार कडकडीत ताळेबंद करण्याचे धोरण आखले. सध्यातरी उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये पाकणी, बेलाटी बीबीदारफळ रानमसले पडसाळी वडाळा मार्डी बाणेगाव भोगाव,अकोलेकाटी नान्नज कळमण कौठाळी मुख्यत्वेकरून ह्या भागातून दोन दिवस तरी आपणास संमिश्र प्रतिसाद पाहावयास मिळतो.

कोरोना संसर्गाची दुस-याला लाटेचे पडसाद सध्या तरी आपणास तीव्र पाहावयास मिळतात. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन टाळून तूर्तास तरी दोन दिवसाची टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला. तालुक्यामध्ये आपणास तूर्तास तरी संमिश्र प्रतिसाद पहावयास मिळतो. प्रत्येक गावांमध्ये सकाळी गर्दी तसेच वीणा मास्क फिरणे हे आपणास आता काही नवीन नाही. नागरिकांनी सध्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मास्क लावणे. सनी टायझर करणे, सामाजिक ठेवणे, आजार लपविने लवकरात लवकर डॉक्टर चा संपूर्ण साधने. लसीकरणास प्राधान्य देणे ही सध्यातरी काळाची गरज आहे. तर आणि तरच आपण या संसर्गजन्य आजारापासून बचाव करू शकतो. हे सर्व समजण्यात मग आता कोणी राहिले नाही तरीदेखील बरेच जण प्रशासनाने ठरवून दिलेली नियमावली झुगारून बाहेर फिरताना दिसतात.

या सर्व बाबींचा विचार करता काल झालेल्या मुख्यमंर्त्यांच्या बैठकीमध्ये येणा-या काही दिवसात लोकडाऊन हा अटळ आहे हे आपण पाहिले आहे. परंतु आता लोकडाऊन च्या निर्णयाने सर्व सामान्य जनता ही भयभीत झाली आहे. एकतर पाठीमागच्या एक वर्षापासून आपण सर्वजण लोकडाऊन चे दुष्परिणाम पाहत आलो आहोत. कामगार, छोटा – मोठा व्यापारी,व्यवसायिक, उद्योगधंदे हे सर्व ठप्प होते. त्या उलट विज बिल, कर्ज हप्ते, जीएसटी, टॅक्स, भाडे सगळ्यात महत्वाचे कुटुंबाचा उदरनिर्वाह हे सर्व चालू त्यामुळे देशातील प्रत्येक वर्ग हा आज कर्जाच्या खाईत गेलेला दिसतोय. अशातच पुन्हा एकदा जर लॉकडाऊन झालं तर जगावं की मरावं या पेक्षा गंभीर प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर कोणताच नसावा.

लॉकडाऊनच्या धास्तीमुळे नागरिक चिंतेत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या