मोहोळ (राजेश शिंदे) : मोहोळ तालुक्यातील अनगर येथील लोकनेते साखर कारखान्यातील बायोगॅसची टाकी अचानक खाली कोसळून झालेल्या दुर्घटनेत गुदमरून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य आठजण जखमी झाले. ही घटना शनिवारी ( ता.२१ ) रात्री पावणेबाराच्या सुमारास कारखान्याच्या आसवनी विभागात घडली. मोहोळ (सोलापूर) अनगर ( ता.मोहोळ) येथील लोकनेते साखर कारखान्यातील बायोगॅसची टाकी अचानक खाली कोसळून झालेल्या दुर्घटनेत गुदमरून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य आठजाण जखमी झाले.
ही घटना शनिवारी ( ता.२१ ) रात्री पावणेबाराच्य सुमारास कारखान्याच्या आसवनी विभागात घडली .ज्योतिराम दादा वगरे ( वय ४५ ) , सुरेश अंकुश चव्हाण ( वय २२, दोघेही रा बिटले ) अशी मृतांची नावे आहेत . सज्जन बाळू जोगदंड ( रा . बिटले ) , मंगेश नामदेव पाचपुंड ( रा . अनगर ) , महेश दिलीप बोडके ( रा . अनगर ) , कल्याण किसन गुंड ( रा . बिटले ) , परमेश्वर मधुकर थिटे ( रा . नालबंदवाडी ) , राजू दत्तात्रय गायकवाड ( रा . कुरणवाडी ) , रवींद्र गजेंद्र काकडे ( रा . अनगर ) , संजय बाजीराव पाचे ( रा . अनगर ) अशी जखमींची नावे आहेत . सर्व जखमींना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून जखमींची प्रकृती स्थिर आहे . मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , अनगर ( ता . मोहोळ ) येथील लोकनेते साखर कारखान्याचे नेहमीप्रमाणे गाळप सुरू आहे, त्याचबरोबर सहवीज निर्मिती व आसवनी प्रकल्पही सुरू आहे.
शनिवारी रात्री पावणेबारा वाजता आसवनी विभागातील बायोगॅस डायजेस्ट गॅस टाकी अचानक खाली कोसळली , त्यामुळे त्यातून मिथेन गॅस व द्रवरूप वायू बाहेर पडून त्यात गुदमरून दोघांचा जागीच मृत्यू झाला , तर अन्य आठ जण जखमी झाले . या दुर्घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी करून माहिती घेतली . या घटनेची खबर डॉ . तेजस्विनी तात्यासाहेब जाधव ( वय २७ , मोहोळ ग्रामीण रुग्णालय ) यांनी दिली असून , अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष इंगळे करीत आहेत.
राज्य सरकारमध्ये कोणाचा कोणाला ताळमेळ लागेना