25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeसोलापूरपंढरपूरजवळ टँकरच्या धडकेत दोन जण ठार

पंढरपूरजवळ टँकरच्या धडकेत दोन जण ठार

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : येथील चंद्रभागा नदीवर असलेल्या अहिल्या पुलावर ेपाठीमागून येणाऱ्या टँकरने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. कार्तिक लाला गायकवाड ( वय १८), कांतीलाल कांबळे (४०, दोघेही रा. भटुंबरे) असे मृत्यू झालेल्या े दोघांची नावे आहेत. शनिवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास अहिल्या पुलावर हा अपघात झाला.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, भटुंबरेकडे कार्तिक गायकवाड, कांतीलाल कांबळे हे दोघेजण दुचाकीवरून निघालेले होते. पाठीमागून येणाऱ्या टँकर (एम. एच. ४६/ एफ. ५७८०) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवून दिले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या