37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeसोलापूरअकलुज येथे निरा नदिच्या पात्रात बुडून दोन अल्पवयिन मुलांचा मृत्यू

अकलुज येथे निरा नदिच्या पात्रात बुडून दोन अल्पवयिन मुलांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

अकलुज : निरा नदिच्या पात्रात पोहण्यास गेल्या दोन अल्पवयिन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना अकलूज शहरात घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकलूज येथील महर्षि काॕलनी परिसरातील शक्ती चंद्रकांत गवळी (वय १६), करण रणजित लांडगे (वय १४), अवधुत हिरा कांबळे (वय १५) व भैया जगन खंडागळे (वय १६) हे चौघे दुपारी निरा नदीच्या पात्रात पोहण्यास गेले.

घाटापासून थोडे अंतर पुढे गेल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे शक्ती गवळी व करण लांडगे हे पाण्यात बुडाले. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न अवधुत कांबळे व भैया खंडागळे यांनी केला. त्यांनी पात्रातून बाहेर येऊन घरी फोन लावल्यानंतर महर्षिनगर परिसरातील अनेक तरूणांनी लगेच निरा नदीच्या घाटाकडे धाव घेतली.

पोहणाऱ्यांनी तरुणांनी पाण्यामध्ये शोध घेतला असता, पाण्यामध्ये दोघेजण सापडले. हाता-तोंडाशी आलेली मुले अशी अचानक निघुन गेल्यामुळे शक्ती आणि करणच्या परिवाराचा शोक अनावर झाला होता. महर्षिकाॕलनी परिसरातील शेकडो लोक यावेळी हळहळ करत होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या