24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्राइम२५ हजारांची लाच मागितल्या प्रकरणी दोघेजण अँटी करप्शनच्या जाळ्यात

२५ हजारांची लाच मागितल्या प्रकरणी दोघेजण अँटी करप्शनच्या जाळ्यात

एकमत ऑनलाईन

सोलापूर : वारस नोंदीच्या हरकतीवर सुनावणी होऊन तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच मागितल्याने मंडल अधिका-यासह कोतवालास दोन वेळा पडताळणी करून अँटीकरप्शन विभागाने ताब्यात घेतले आहे.

मदनसिंग सुपडसिंग परदेशी वय-३५, पद-मंडल अधिकारी,अपर तहसील कार्यालय मंद्रुप ता. दक्षिण सोलापूर, मल्लिनाथ रेवणसिध्द बाळगी (वय-३६,पद-कोतवाल, अपर तहसील कार्यालय मंद्रुप (ता. दक्षिण सोलापूर) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

प्राप्त तक्रारीनुसार तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी कार्यालय येथे दिलेल्या वारस नोंदीच्या हरकती अर्जावर सुनावणी होऊन तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी यातील आलोसे कोतवाल मल्लिनाथ बाळगी यांनी मंडळ अधिकारी परदेशी यांच्याकरिता म्हणून तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी केली व त्याबाबत खात्री करून देण्याकरिता तक्रारदार यांचे मंडळ अधिकारी परदेशी यांच्याशी फोनवरून बोलणे करून दिले असता मंडळ अधिकारी परदेशी यांनी त्यास संमती दिल्याने दोन्ही आलोसे यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. ही कारवाई उमाकांत महाडिक, पोलिस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर पोलिस अंमलदार- शिरीषकुमार सोनवणे, पोना अतुल घाडगे, पोशि स्वप्नील सण्णके, चापोशि उडानशिव यांनी केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या