तालुकाप्रतिनिधी/मोहोळ
मोहोळ तालुक्यातील आष्टे गावा जवळून रात्रगस्त करीत असताना दि . २१/०६/२०२२ रोजी वडवळ पुलाजवळ समोरून दोन टॅम्पो आलेले दिसले . सदर टॅम्पो मध्ये वाळु असल्याचा संशय आल्याने सदरचा टॅम्पो थांबवुन तपासले असता दोन्ही टॅम्पो मध्ये वाळु आसल्याचे दिसुन आली .
याबाबत वाळु चालकाकडे विचारले असता चालकाने कोणत्याही प्रकारची रॉयल्टी पावती नसल्याचे सांगितले त्यांना कोठुन वाळु आणली आहे असे विचारले असता त्यांनी सिना नदी पात्रातून आणली असल्याचे सांगितले त्यावरून दोन्ही टॅम्पो व सिना नदी पात्रातील आष्टे बंधारा येथे केलेला वाळुचा स्टॉक याची पाहणी केली असता सर्व ठिकाणची मिळुन एकुन २४ ब्रास वाळु व दोन टॅम्पो असे एकुन १५ लाख ९ ० हजार रू . चा मुद्देमाल जप्त केला व आरोपी १ ) नागेश आण्णा वाघमोडे रा नजीक ंिपपरी २ ) उमेश दादाराव शिरसट रा भोयरे ३ ) श्रीकांत दत्तात्र यादव रा . दत्तनगर मोहोळ ४ ) बाळासाहेब सत्यवाण शिंदे रा . भोयरे सर्व ता . मोहोळ जि .. सोलापूर यांना अटक करण्यात आली आहे . सदरची कारवाई मा . पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपूते मॅडम अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव सो उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक सायकर व पो.हे. कॉ / शरद ढावरे , पोना / विठ्ठल पठाडे , पोकॉ / पांडुरंग जगताप , पोकॉ / मोहोन पवार , चालक पोकॉ / श्रीशेल शिवने व पोकॉ / नानासाहेब आवघडे यांनी केली आहे . याचा पुढील तपास मोहोळ पोलिस ठाणे करीत आहे.