सोलापूरःशहरातील विविध ठिकाणच्या वाहनतळांवर लावण्यात आलेल्या पण त्यांना लॉक नाही, अशा दुचाकी शोधून त्यांची चोरी करणाऱ्याला गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने सापळा लावून अटक केली आहे.
शफी मौला शेख (वय ५२, रा. नई दुचाकींसह चोरट्यास जेरबंद केल्यावर घेतलेल्या छायाचित्रात गुन्हे शाखेचे जिंदगी) असे दुचाकी चोरीप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दहा दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत, अशी माहिती
सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रीतीटिपरे यांनी दिली.हा आरोपी वीस वर्षांपूर्वी सायकली चोरत होता.
यामुळे त्याचे पूर्वीचे रेकॉर्ड तपासलेजात आहे, अशी माहिती पोलिसांनी दीली.शफी हा व्यवसायाने पेंटर असून कर्जबाजारीपणामुळे त्याने दुचाकींची चोरी सुरू केली होती त्याला ८ जुलै रोजी पोलीसांनी अटक केली होती.
त्याने लपवून ठेवलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.सध्या त्याला न्यायालयीन को ठडी सुनावण्यात आली आहे.ही कामगीरी पोलीस आयुक्त राजेंद्र माने सहायक पोलीस आयुक्तडॉ. प्रीती टिपरे, पोलीस उपायुक्त बापू बांगर,गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखालीही शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस , निरीक्षक संदीप पाटील, अमित रावडे, , श्रीकांत पवार, राहुल तोगे, विजयकुमार वाळके, गणेश शिंदे यांनी पार पाडली.