25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeसोलापूरउजनीचा पाणी प्रश्न पुन्हा पेटला

उजनीचा पाणी प्रश्न पुन्हा पेटला

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यासाठी नेले असल्याचा ठपका ठेवत जिल्ह्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून यामध्ये अनेक संघटनांसह शेतकरी संघटनांनी आक्रमक आंदोलन सुरू केले आहे. याच दरम्यान आज उजनी धरण पाणी बचाव समितीच्या वतीने उजनी धरणात उतरून जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

सकाळपासून उजनी धरणा वरती पदाधिकारी व कार्यकर्ते जमा होऊ लागल्याने पोलिसांकडून बंदोबस्त लावण्यात आला होता. यानंतरही जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकरभैया देशमुख शेतकरी नेते अतुल खुपसे, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊली हळणवर, शिवसेनेचे संजय कोकाटे, अँड बापूसाहेब मिटकरी, रोपळे येथील औदुंबर गायकवाड, धनाजी गडदे, माऊली जवळेकर व शेतक-यांनी उजनी धरणात उतरून आंदोलनाला सुरुवात केली.

यानंतर पोलिसांनी आंदोलन थांबवण्याची विनंती केली यावरून पोलीस व आंदोलन करते यांच्यामध्ये खडाजंगी झाली. कोणत्याही परिस्थितीमध्ये आश्वासक पर्याय निघाल्याशिवाय आंदोलन न थांबवण्याच्या निर्णयावर आंदोलक ठाम होते. यावेळी धरणातील पाणी पळवा पळवी चा निषेध करीत पालकमंर्त्यांविरोधात चले जाव च्या जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती.

मॉडर्ना लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी; डब्ल्यूएचओकडून मान्यता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या