20.7 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeसोलापूरव्ही. पी. शुगर्सकडून १५ जानेवारीपर्यंतच्या उसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

व्ही. पी. शुगर्सकडून १५ जानेवारीपर्यंतच्या उसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

एकमत ऑनलाईन

अक्कलकोट : तडवळ (ता. अक्कलकोट) येथील व्हीपी शुगर्स या कारखान्याचा गळीत हंगाम २०१२२-२३ व्यवस्थितपणे चालू आहे. कारखान्याने हंगाम चालू झाल्यापासून १० ते १५ दिवसात प्रत्येक पंधरवड्याचे बिल शेतकऱ्यांना दिले आहे.

दि. १ ते १५ जानेवारी या कालावधीचे उसाचे बिल २२०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्याच्या खात्यात दिलेल्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती चेअरमन सी.ए. व्ही. पी. पाटील यांनी दिली. दि. १७ जानेवारीपासून शेतकरी ऊस बिल उचल करू शकतात. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पंधरवडा संपल्यानंतर एका दिवसात बिल देण्याचा प्रयत्न कारखान्याने केला आहे. आतापर्यंत ३ लाख ७६ हजार मे. टन ऊस गाळप केले आहे. दोन कोटी ८० लाख युनिट वीजनिर्मिती व एक कोटी ८२ लाख युनिट वीजविक्री झाली आहे. कारखान्याने जानेवारी निर्यातीसाठी कच्ची साखर विक्रीचे करार केले असून, सध्या कच्ची साखर निर्यात चालू आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या