25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeसोलापूरएसटी बंदमुळे विक्रेत्यांची उपासमार

एसटी बंदमुळे विक्रेत्यांची उपासमार

एकमत ऑनलाईन

मलिकपेठ : मोहोळ एसटी स्टँड येथुन ग्रामीण भागासाठी रवाना होणा-या एसटी बार्शी,वैराग या गाड्या काही कालावधीसाठी बंद करण्यात आले आहेत.बार्शी,वैराग एसटीच्या दिवसाला आठ ते दहा फे-या होत असतात.ग्रामीण भागातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.लॉक डाउन असल्याकारणाने सोलापूर,कुर्डूवाडी,पुणे,सातारा,कराड या एसटीच्या फे-या दिवसातून तीन ते चार तासानंतर एसटी जात असल्याने प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.प्रवास करणा-या नागरिकांनी आवश्यक असेल तरच प्रवास करणे योग्य होणार आहे.

मोहोळ एसटी स्टँड मधील लहान फेरीवाले यांचा उदरनिर्वाह एसटीच्या प्रवाशांवर चालत असतो कोरोनाचे संकट असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.एसटीच्या र्फे­या कमी प्रमाणात झाल्याने दिवसाला दोनशे ते तीनशे रुपये मिळवणारे फेरीवाले आज त्यांना पन्नास रुपये सुद्धा मिळणे कठीण झाले आहे.लहान फेरीवाल्यांना कोणतेही सुविधा,योजना मिळत नाही.फेरीवाले नोंदणी धारक फेरीवाले असून बँक वाले या लोकांना कर्जसुद्धा देणे पसंत करत नाही. कर्ज न देणा-या मोहोळ मधील बँकांवर कारवाई करण्याची मागणीही फेरीवाल्याकडुन होत आहे.शासन प्रशासनाने माणुसकीच्या दृष्टिकोनातून बघून उपासमारीची वेळ थांबवावी.अशी मागणी फेरीवाल्यांकडून होत आहे.

मोहोळ स्टँड मधील पाच रुपयाचे मिळणारे जेवन शिव भोजन थाळी बंद झाली आहे.कोरोना महामारी मुळे लावण्यात आलेले लॉक डाऊन नियमाचे उल्लंघन करणारे नागरिक व कोरोनाला रोखण्यासाठी शासनाचे चाललेले प्रयत्न अतिउत्साही नागरिकांमुळे वाया जाऊ नये.

नांदेडकरांसाठी एकच पर्याय कडक लॉकडाऊन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या