27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeसोलापूरउच्चभ्रू वसाहतीतील कुंटणखान्यावर धाड पीडितेची सुटका : दोघींना अटक

उच्चभ्रू वसाहतीतील कुंटणखान्यावर धाड पीडितेची सुटका : दोघींना अटक

एकमत ऑनलाईन

सोलापूर : विजापूर रोडवरील एका घरामध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर धाड टाकून दोन केला. महिलांना अटक करण्यात आली आहे. हि कारवाई अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वतीने केली असून पीडित महिलेची सुटका करण्यात आली.

वर्षा दत्ता माशाळे (वय ३२, रा. महालक्ष्मी नगर), सुजाता विवेक कांबळे (वय ३३, रा. स्वामी विवेकानंद नगर, ओमगर्जना चौकाजवळ) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. महालक्ष्मी नगरात घरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती, अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांना मिळाली होती. पथकासह त्यांनी मंगळवारी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास सापळा रचला, बनावट ग्राहक पाठवून दिले. बनावट ग्राहक आत गेल त्याने पैसे दिले व आत जाताना दबा धरून बसलेल्या पोलिसांना इशारा मिळताच पोलिसांनी घरावर धाड टाकली तेव्हा कुंटणखाना चालवणा-या दोन महिला व पीडित महिला आढळून आल्या.

पीडितेकडे चौकशी केली असता, दोघींनी वेश्या व्यवसाय करण्याच्या बदल्यात पैसे मिळत असल्याचे सांगितले. या प्रकरणी दोघींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री, हवालदार बंडगर, पोलीस नाईक सत्तार पटेल महिला पोलीस नाईक गवळी, मुजावर,मंडलिक, उषा माळगे, शैला चिकमळ, चालक गोरे यांनी पार पाडली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या