24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeसोलापूरचांगले काम करणा-यांच्या पाठीशी विलासराव देशमुख नेहमी असत

चांगले काम करणा-यांच्या पाठीशी विलासराव देशमुख नेहमी असत

एकमत ऑनलाईन

सोलापूर: सन २००३ साली औरंगाबाद येथे गुन्हे शाखेचा मी उपायुक्त होतो. त्यावेळी मराठवाडा साहीत्य संमेलनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख उदघाटक होते.त्याचवेळी पोलिसांनी एका लहान मुलाची अपहरणातून अठरा तासांत सुटका केली होती.मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना ही घटना समजल्यावर त्यांनी माझ्यासह सर्व पोलिस सहका-यांचा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर सत्कार केला.

चांगले काम करणा-यांच्या पाठीशी ते नेहमीच उभे राहात. अशी भावपुर्ण आठवण सोलापुरचे पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी सांगीतली. ते दैनिक एकमत कार्यालयात लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन प्रसंगी बोलत होते.

लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त एकमत कार्यालयात त्यांनी लोकनेत्यांच्या आठवणींना उजाळा दिला. दैनिक एकमतचे सोलापूर आवृृत्तीप्रमुख संजय येऊलकर यांनी स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रवक्ते पशुपती माशाळ उपस्थीत होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या