37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeसोलापूरकोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे उल्लंघन, डॉक्टरांवर गुन्हा

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे उल्लंघन, डॉक्टरांवर गुन्हा

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापुरातील कलावती नगरातील शिवशक्ती चौकातील बनशंकरी क्लिनिकमध्ये मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह मनपाच्या अधिका-यांनी भेट दिली असता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याबाबत आयुक्तांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने रूग्णालयाच्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानवी आरोग्याला धोका होईल. कोरोनाचा संसर्ग पसरण्या संदर्भात हयगय केल्याचा ठपका ठेवत डॉ. शशिकांत चंद्रकांत खजुरगी यांच्या विरूध्द कलम १८८ सह आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ४२ (२) प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. तसेच सोलापुरातील डॉ. मोनाली देशमुख, डॉ. नफिसा शेख, डॉ. अमोल देशमुख यांनाही नोटीस दिल्याची माहिती मनपा उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली.

खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी ताप सदृश्य अथवा आयएलएस रूग्ण आढळल्यास त्याला औषधोपचारासह मनपाच्या बॉईज, दाराशा प्रसुतीगृह, मजरेवाडी शहरी नागरी आरोग्य केंद्र व मुद्रा सनसिटी या चार ठिकाणी कोरोनाचा स्वॅब घेण्यासाठी पाठवावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत. स्वॅब घेतल्यानंतर डॉक्टरांनी याबाबतची माहिती मनपाच्या आरोग्य अधिका-यांकडे व कंट्रोलरूमकडे ईमेल आयडी व त्यांचा अहवाल पाठविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

प्रपत्र १ व २ नुसार माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. शहरातील काही क्लिनिक या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचे आढळल्यानंतर मनपाने कारवाई केली आहे. बनशंकरी क्लिनिकमध्ये मनपा आयुक्तांनी दिलेल्या भेटीप्रसंगी उपायुक्त अजयसिंह पवार, वैद्यकीय अधिकारी सतिश बोराडे उपस्थित होते.

गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या