सोलापूर : लग्नाचे आमिष दाखवत पीडित महिलेला व तिच्या कुटुंबीयांचा सांभाळ करण्याचे आश्वासन देत जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून श्रीकांत बनसोडे (रा. सिद्धार्थ चौक) याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
पीडितेने काही वर्षांपूर्वी घटस्फोट दिला असून, तिला एक मुलगा आहे. घटस्फोटानंतर ती आपल्या आईसोबत राहत असताना आरोपी श्रीकांत बनसोडे यांच्यासोबत तिची ओळख झाली. त्यानंतर आरोपी श्रीकांत याने पीडितेला हॉटेलमध्ये बोलावत तिला व तिच्या मुलाचा संभाळ करतो असे सांगितले. तसेच जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पीडितेने नकार दिला. त्यावेळी त्याने मुलाला व पीडितेला मारून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर लग्न करण्याचे अश्वासन देत घर भाड्याने घेण्यासाठी पीडितेकडून दोन लाख रुपये घेतले. नंतर मात्र टाळाटाळ करू लागला. त्यानंतर आरोपी श्रीकांत, त्याच्या पत्नीने आणि आईने फोन करून शिवीगाळ केली. यामुळे याप्रकरणी श्रीकांत बनसोडे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.