24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeसोलापूरकार्तिकी यात्रेत विठ्ठलाचे मुखदर्शन राहणार बंद; विठ्ठल मंदिर समितीचा निर्णय

कार्तिकी यात्रेत विठ्ठलाचे मुखदर्शन राहणार बंद; विठ्ठल मंदिर समितीचा निर्णय

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : कार्तिकी एकादशी सोहळ्या दरम्यान पंढरपूरात गर्दी होऊ नये यासाठी २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान तीन दिवस पंढरीच्या पांडुरंगाचे मुखदर्शन बंद राहणार आहे. तसेच मुखदर्शनासाठी आवश्यक असणारे ऑनलाईन पास देखील बंद ठेवण्याचा निर्णय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती घेतला असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर शासन आदेशानुसार १६ नोव्हेंबरपासून दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये. यासाठी दर्शन पासची ऑनलाईन बुकिंग आवश्यक करण्यात आले आहे. त्याचबरोबर दिवसभरात मोजक्याच भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे. असे असले तरी पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर २५ व २६ नोव्हेंबर संचार बंदी करण्यात आली आहे. यामुळे २५ ते २७ नोव्हेंबर पर्यंत मुखदर्शन देखील बंद करण्यात आले असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

सहा ट्रॅक्टर घाण, कचरा बाहेर काढला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या