25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeसोलापूरपंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी उस्फुर्तपणे मतदान

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी उस्फुर्तपणे मतदान

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. ५२४ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या पोटनिवडणुकीमुळे मतदारांची आरोग्याची खबरदारी घेतली जात होती.तसेच रात्री सात वाजेपर्यंत मतदानासाठी वेळ वाढवण्यात आली होती. यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७.८१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण ३ लाख ४० हजार ८८९ मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार १ लाख ७८ हजार १९० तर १ लाख ६२ हजार ६९४ महिला मतदार आहेत. त्यापैकी दुपारी ५ वाजेपर्यंत १ लाख ९७ हजार ५५ मतदारांनी मतदान केले होते. पुढे रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू होती.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शनिवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ११ वाजेपर्यंत कमी प्रमाणावर मतदान झाले होते मात्र अकरानंतर मोठ्या प्रमाणावर मतदान झाले असल्याचे दिसून आले. सकाळी ९ वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यात ६.४२ टक्के मतदान झाले होते. यामध्ये २१ हजार ८८८ मतदारांनी मतदान केले. तर दुस-या टप्प्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १९.३३ टक्के मतदान झाले.आकरा वाजेपर्यंत ६५ हजार ८९१ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. तर दुपारी १ वाजेपर्यंत ३३.१२ टक्के मतदान झाले. एक वाजेपर्यंत १ लाख १२ हजार ८९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान झाले. तीन वाजेपर्यंत १ लाख ५५ हजार २०२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७.८१ टक्के मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत १ लाख ९७ हजार ५५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.पुढे रात्री सात वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. अनेक मतदान केंद्रावर मतदान सुरू होते.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक चुरशी झाल्याचे पाहायला मिळाले. यासाठी राष्ट्रवादीचे भगीरथ भालके तर भाजपाचे समाधान आवताडे यांच्यासह १९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यासाठी ची मतमोजणी २ मे रोजी पंढरपूर येथील शासकीय गोदाम येथे होणार आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यांमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण चिंतेची बाब

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या