22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeसोलापूरनऊ जणांचा जीव गेल्यानंतर सुस्त सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग

नऊ जणांचा जीव गेल्यानंतर सुस्त सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग

एकमत ऑनलाईन

मोहोळ (प्रतिनिधी): वैराग रस्त्यावरील दाईंगडेवाडी पाटीजवळील धोकादायक वळण हे वाहनचालकांसाठी जणू मृत्यूचा सापळाच झाला की काय? दाईंगडेवाडी पाटी ते मलिकपेठ रेल्वे गेट पर्यंत धोकादायक वळणे असून या परिसरात नेहमीच दुचाकी-चारचाकी यांची धडक होऊन आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झालेला असून २० जण जखमी झाले आहेत या परिसरात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत . त्या वळणावरती ८ ते जणांचा अपघाती मृत्यू झाला होता दाईंगडे वाडी पाटी ते रेल्वे गेट पर्यंत एकही दिशादर्शक फलक नसल्याने आतापर्यंत ९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे या दुर्घटनेला जबाबदार कोण? असा प्रश्न या परिसरातील नागरिकाकडून विचारण्यात येत आहे.

९ जणांना आपला जीव गमवाल्या नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला आता कुठे जाग आली आहे .सूचना देणारे दिशादर्शक फलक मोहोळ ते नरखेडगावापर्यंत १४ ठिकाणी वळणे आणि ४ ठिकाणी अपघाती क्षेत्र असे सूचनाफलक बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे . मोहोळहून वैराग ला जाण्यासाठी आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ बार्शीला जाण्यासाठी याच रस्त्यानी जावे लागते.या धोकादायक वळणावर गेल्या तीन ते चार वर्षात वेगवेगळ्या अपघातांमध्ये ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत.

याठिकाणी सूचना फलक तसेच दिशादर्शक फलक नसल्याने रात्री – अपरात्री प्रवास करणाऱ्या व या रस्त्याने नवीन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना या धोकादायक वळणाचा जराही अंदाजच येत नसल्या कारणाने याठिकाणी मोठे अपघात होत आहेत . याकडे मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू होते .या परिसरातील नागरिकांची सतगातची मागणी असूनही त्या मागणीकडे दुर्लक्ष केले गेले . सार्वजनिक बांधकाम विभाग मोहोळ शाखेकडून मोहोळहून नरखेड गावापर्यंत जाताना ६ ठिकाणी आणि नरखेड गावाकडून मोहोळकडे येणाऱ्या ६ ठिकाणी अशा एकूण १२ ठिकाणी धोकादायक वळण असल्यचे सूचनाफलक लावण्यास सुरुवात केली आहे .

धक्‍कादायक! कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या