24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeसोलापूरजास्त वेळ गाडी का थांबली म्हणून बस चालकाची धुलाई

जास्त वेळ गाडी का थांबली म्हणून बस चालकाची धुलाई

एकमत ऑनलाईन

माळशिरस : कोरोना महामारी, संपानंतर एसटी रुळावर येत असतानाच पुणे-पंढरपूर रस्त्यावरील नातेपुते येथील ढाब्यावर जेवणासाठी थांबलेल्या गाडीवरून वादावाद होऊन एसटी चालकास प्रवाशाने मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली.

मंगळवेढा आगाराची स्वारगेट पंढरपूर गाडी संध्याकाळी ८ वाजता नातेपुते येथील ढाब्यावर जेवणासाठी उभी राहिली होती. यावेळी गाडी १० मिनिटे थांबेल असे वाहकाने सांगितले. त्यानंतर गाडीतील प्रवासी ज्ञानेश्वर उराडे यांनी १० मिनिटे झाली असून गाडी कधी सुटणार, अशी विचारणा चालक इनामदार यांना केली. यावरून वाद वाढत जाऊन उराडे यांनी चालकास लाथाबुक्क्या, शिवीगाळ करीत मारहाण केल्याची फिर्याद चालक इनामदार यांनी नातेपुते पोलिसात दिली आहे.

या प्रकरणी प्रवाश्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास सुरू आहे. लवकरच संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सपोनि मनोज सोलवनकर यांनी सांगीतले.

सर्व आगाराच्या बस याठिकाणी नास्ता, चहा, जेवणासाठी नेहमीच थांबतात. मात्र वेळेवरून प्रवासी व चालक-वाहकांमधील वाद अनेकवेळा घडत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने याबाबत लक्ष घालून ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता प्रवाशांमधून व्यक्त केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या