18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeसोलापूरसरकारी पाहुण्यांची आम्हाला चिंता नाही : खा. शरद पवार

सरकारी पाहुण्यांची आम्हाला चिंता नाही : खा. शरद पवार

एकमत ऑनलाईन

सोलापूर : मागील दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांच्या घरी आणि संबंधित व्यक्तींच्या कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले. यावर बोलताना शरद पवारांनी भाजपला टोला लगावला. अजित पवारांच्या घरी पाठवलेल्या सरकारी पाहुण्यांची आम्हालाचिंता नाही. कोणत्याही पाहुण्यांची आम्हाला कधीचचिंता नसते, असे पवार म्हणाले. तसेच माझा संबंधही नसलेल्या बँकेशी मला जोडून ईडीने नोटीस पाठवली. यानंतर लोकांनी भाजपला वेडी ठरवली, असं खा. शरद पवार म्हणाले. सोलापूरमध्ये राष्ट्रादीचा मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी भाजपवर टीका केली.

ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्यांच्याकडून होणारा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसतोय, असा टोला पवार यांनी लगावला. आजचं केंद्र सरकार देशातील रेल्वे स्थानकांचं खासगीकरण करण्याचं काम करत आहे. नेहरूंच्या काळात पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी भर देण्यात आला. मात्र, मोदी सरकार सर्व गोष्टी व्यापा-यांच्या हातात देत आहे. बंदरं, विमानतळं, दळणवळणाची साधनं या सर्व गोष्टींच्या खासगीकरणाचे प्रयत्न केंद्राचे सुरू आहेत, असे पवार म्हणाले.

वाढत्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार असल्याचंही शरद पवार म्हणाले. त्यांनी इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. शेतीप्रधान देशात शेतक-याची परिस्थिती खालावली. मात्र, सरकारने शेतक-यांना मदत पोहोचवली नाही. उलट शांत मार्गाने आंदोलन करणा-या शेतक-यांच्या अंगावर भाजप सरकारने गाड्या घातल्या.

भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्याचे आवाहन पवार यांनी केले. सोलापूरच्या महानगपालिका निवडणुकांसाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भाषण दिलं. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांसाठी महिलांना ५० टक्के जागा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात पहिल्यांदाच राष्ट्रवादीकडून ५० टक्के महिलांना तिकीट वाटप होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या