23.1 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home सोलापूर सरकार जाईल त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ

सरकार जाईल त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ

एकमत ऑनलाईन

सोलापूर: माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तीन पक्षांची अनैसर्गिक असणारे सरकार टिकणार नाही. ज्या दिवशी हे सरकार जाईल त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आगामी काळात मनसेला सोबत घेणार नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी शिवसेनेचे खा. संजय राऊत यांच्यावर देखील टिका केली. अनैसर्गिक आघाडीने तयार झालेले राज्य सरकारचे नाकर्तेपण लपविण्यासाठी संजय राऊत यांना आता भाजपच्या विरोधात अग्रलेख लिहिण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही अशी टिका देवेंंद्र फडणवीस यांनी केली. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी महापौर श्रीकांचन्ना यन्नम, खा. जयसिध्देश्वर महास्वामी, खा. रणजितसिंह निंबाळकर, आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी फडणवीस यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई, निसर्ग चक्रीवादळ, प्रताप सरनाईक यांच्यावरील इडीची कारवाई आणि वाढीव विज बिलावरून राज्य सरकारवर टिकास्त्र सोडले. वाढीव विजबिला संदर्भात सरकारने घुमजाव केले आहे. राज्य सरकारने पलटी मारली आहे. महावितरणसह तीन विज कंपन्यांच्या भाजप सरकार काळातील केवळ पाच वर्षाची चौकशी न करता वीस वर्षाची चौकशी करावी. कारण सर्वात कमी दराने वीज खरेदी आमच्याच सरकारच्या काळात झाली आहे आणि चांगल्या पध्दतीने महावितरणची सेवा लोकांना उपलब्ध करून दिली होती असेही ते म्हणाले.

दरम्यान अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात मोठया प्रमाणावर नुकसान झाले आ.हे. नदीकाठावरील ऊसासह सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले. निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या कोकणाला काही मिळाले नाही. फळबागांना कोणतीही मदत देताना दिसत नाही अशी टिका देवेंंद्र फडणवीस यांनी केली आहे.

शिरूर अनंतपाळ नगर पंचायत मधील भ्रष्टाचाराची चौकशी करावी. महाविकास आघाडी तर्फे महामोर्चा काढून कुलूप बंद आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,437FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या