23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeसोलापूरही लढाई आम्ही शंभर टक्के जिंकू : आ.प्रणिती शिंदे

ही लढाई आम्ही शंभर टक्के जिंकू : आ.प्रणिती शिंदे

एकमत ऑनलाईन

सोलापूर : एकनाथ शिंदे यांच्यासह १७ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, असे पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि गटनेते अजय चौधरी यांच्या सहीने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना देण्यात आलेले आहे. चौधरी यांच्या गटनेतेपदास उपाध्यक्षांनी संमती दिलेली आहे, त्यामुळे व्हीप असूनही शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या बैठकीस उपस्थित न राहिल्याने शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील. त्यातून शिंदे गटच अनधिकृत ठरेल. विधानसभेचे उपाध्यक्षही तसाच निर्णय देतील, तशी आम्हाला आशा आहे, असे काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष तथा आमदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले.

नगरविकास मंत्री शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी उलथापालथ सुरू आहे. तब्बल ४० आमदार आपल्याकडे असल्याचा दावा शिंदे यांनी केलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार तर अडचणीत आले आहेच. त्यापेक्षा मोठ्या संकटात शिवसेना अडकली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, विधान परिषदेच्या निकालानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार रातोरात गुजरातला हलवले. त्यामुळे शिवसेना पक्षात उभी फूट पडली आहे. शिंदे गटाकडे शिवसेना आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मात्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. ही लढाई आम्ही १०० टक्के जिंकू, असा दावाही त्यांनी केला आहे.

शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १७ आमदारांना अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव विधानसभा उपाध्यक्षांकडे दिला आहे, त्यानुसार पुढील निर्णय होईल. व्हीप असूनही शिवसेना विधींमडळाच्या बैठकीस उपस्थित न राहिल्याने शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील. मला वाटतंय विधानसभेचे उपाध्यक्ष तसा निर्णय देतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्या राज्यात मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंसोबत असल्यामुळे या गोष्टींची गरज भासणार नाही. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये निधी वाटपावरून आरोपप्रत्यारोप होत आहेत. मात्र, मागच्या तीन टर्म आमदार असल्याने कोणाचं ही सरकार असलं तरी मतदारसंघासाठी निधी खेचून आणल्याचा दावा प्रणिती शिंदेनी सोलापुरात बोलताना केला आहे. सोलापुरात आज ‘ग्रंथप्रेमी, सुजन नेते सुशीलकुमार शिंदे’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या दरम्यान प्रणिती शिंदे यांनी हे विधान केले आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या