20.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeसोलापूरसोलापुरात गणरायाचे भक्तीभावात स्वागत

सोलापुरात गणरायाचे भक्तीभावात स्वागत

एकमत ऑनलाईन

सोलापूर : शुक्रवारी सकाळी सहापासूनच घरगुती गणेशमूर्ती खरेदीसाठी शहरातील ठिकठिकाणी भाविकांची गर्दी दिसून आली. काहीजण हलग्यांच्या निनादात, काहीजण दुचाकी वाहनावर, काही ठिकाणी सहकुटुंब तर काही ठिकाणी बच्चेकंपनीकडून ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणा देत श्री गणेशाचे स्वागत करण्यात आले. तसेच मिठाई तसेच फूलहारांच्या खरेदीसाठी झुंबड दिसून आली. एकूणच शहरातील गणेशोत्सव कोरोनाच्या पाश्र्­वभूमीवर साधेपणाने साजरा होत असला तरी गणेशाच्या स्वागताचा जोश मात्र सगळीकडे पाहण्यासारखा होता.

कोरोना पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या बंधनाचा परिणाम यंदाही सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवावर दिसून आला. कोणत्याही प्रकारे मिरवणुकांना परवानगी नाही इतकेच काय वाजत गाजतही गणरायाचे आगमन नाही. अनेक घरगुती गणपती मूर्ती भाविकांनी आधीच आणल्या असून प्रतिष्ठापना करण्यात आली.

सार्वजनिक मंडळांनी मंदिर किंवा आपल्या खाजगी जागेतच श्रींची प्रतिष्ठाना केली आहे. टिळक चौक, कौंतम चौक, पूजा साहित्य तसेच मूर्ती खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ शहराच्या प्रमुख बाजारपेठेत होती. गणरायांच्या आगमनापाठोपाठ रविवारी गौरी आवाहन तर सोमवारी पूजन असे धार्मिक कार्यक्रम आहेत. त्यासाठीचे साहित्य खरेदीसाठी भाविकांनी तयारी सुरु केली आहे.शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. कोरोनाचे नियम व्यावसायिक तसेच भाविक पाळतात की नाही, याकडे पोलिसांचे लक्ष आहे. तसेच दरवर्षी विविध भारतीय वेशभूषा करून गणपती प्रतिष्ठापना करणा-या डोईजोडे कुटुंबातील सदस्यांनी यावेळेस पंजाबी वेशभूषा करून गणेशाचे स्वागत केले.

महापौर श्रीकांचन यन्नम यांनी यशवंत हाउंिसग सोसायटी येथील आपल्या निवासस्थानी मोठ्या भक्तिभावाने घरगुती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली. दुपारी साडेबारा वाजता महापौर श्रीकांचना यन्नम त्यांचे पती रमेश यन्नम, पवनकुमार यन्नम, वृषाली यन्नम यांच्या उपस्थितीत बाप्पाची आरती करण्यात आली.

आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना
सोलापूरचा मानाचा गणपती ‘आजोबा गणपती’ यांचे सार्वजनिक गणपतीचा १३६ व्या वर्षी प्रतिष्ठापना संपन्न झाली. सकाळी ८ वाजेपासून प्रारंभ झालेला शास्त्रोक्त व पारंपारिक पद्धतीने पूजा सकाळी १०.३० वाजेपर्यंत वे. मु. रतिकांत स्वामी यांच्या पौरोहित्यांनी झाला. याप्रसंगी गणेशसहस्त्र नामावली, अथर्वशीर्षपठन, रुद्रापठण, होम हवनने संपन्न झाले. नूतन अध्यक्ष चिदानंद वनारोटे व काकासाहेब मेंडके यांच्या हस्ते महापूजा व महाआरती संपन्न झाली. याप्रसंगी अनिल सावंत, कमालाकर करमाळकर, ईरण्णा मेंडके, प्रसिद्धीप्रमुख सिद्धारुढ निंबाळे व सर्व ट्रस्टी पदाधिकारी व गणेशभक्त उपस्थित होते. महाआरतीनंतर ऑनलाईन दर्शनाची सेवा उपलब्ध करण्यात आली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या