21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeसोलापूरसंत ज्ञानेश्वर-संत तुकाराम महाराज पालख्यांचे स्वागत

संत ज्ञानेश्वर-संत तुकाराम महाराज पालख्यांचे स्वागत

एकमत ऑनलाईन

पिंपरी : कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत माळशिरस तालुक्यातील नातेपुते ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. गत वर्षांपासून माऊलींचा पायी पालखी सोहळा जागतीक कोरोना महामारीच्या संकटामुळे न होता महाराष्ट्र शासनाच्या एस.टी बसनेच होत आहे . यंदाही हा पालखी सोहळा एस.टी बसनेच आज दुपारी १२ वाजता नातेपुते नगरीतून मार्गस्थ झाला.

हा एस.टी-पालखी सोहळा आळंदीमधून ९ वाजता पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. रस्त्यामध्ये ठिक-ठिकाणी पालखी सोहळ्याचे भावीकांनी मनोभावे दर्शन घेतले. रस्त्यामध्ये भावीकांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी करू नये यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध घातले होते . मात्र भाविकांच्या मनामध्ये पालखी सोहळ्याची तिव्र ओढ असल्याचे दिसून येत होते. सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत माऊलींच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी नातेपूते ग्रामपंचायतीने तर भव्य शामियानाच उभारला होता. ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच , सर्व सदस्य, प्रतिष्ठीत नागरिक , दिंडीचालक, भजनी मंडळ यांनी विशेष स्वागत केले. तर रस्त्याच्या दुतर्फा भावीकांनीही दर्शनासाठी गर्दी केली होती.

संकट कसलेही असलेकिंवा शासनाने कितीही कडक निर्बंध लादले तरी विठ्ठल भक्तांच्या मनामध्ये पालखी सोहळ्याची अतोनात ओढ असल्याचे दिसून येत होते. आळंदी मधून एस.टी-पालखी सोहळा सकाळी ९ वा. निघाल्यापासून प्रत्येक गावागावात सोहळा कुठे आला हा एकच विषय फोनवरून ऐकायला मिळत होता. जसजसा हा एस.टी-पालखी सोहळा आपल्या गावाच्या जवळ येईल तसतशे दर्शनासाठी एकमेकांना फोन करून सांगितले जात होते. एकंदरीतच माऊलींच्या दर्शनासाठी प्रत्येकालाच ओढ लागली होती , मात्र प्रशासनाने घातलेले निर्बंध आणि कोरोनाची भीती यामुळे गेल्या वर्षापासून भाविकांना आपल्या भावनांना बांधून ठेवावे लागले आहे.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन
जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सोलापूर जिल्हात 4 वा अगमन झाले.पुणे जिल्हा हद्दीतून सोलापूर जिल्हात अकलुज येथे 4 वा दाखल होऊन माळीनगर श्रीपूर बोरगाव तोंडले बोडले हुन पंढरपूर कडे रवाना झाल्या. संत तुकाराम महाराज यांच्या पादुका एस.टी.ने पंढरपूर च्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. १ जुलै रोजी तुकोबांचा पालखी सोहळा मुख्य मंदिरात पार पडला होता. दरम्यान, करोनाचं संकट असल्याने यावर्षी देखील पालखी मुख्य मंदिरात विसावल्या होत्या. तर, आज एस.टी.मधून ग्यानबा तुकाराम म्हणत टाळ मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. १ जुलै पासून देहूच्या मुख्य मंदिरात गोल रिंगण, मेंढ्यांच रिंगण, अश्वाच रिंगण असे सोहळे पार पडले आहेत.

हे सर्व सोहळे दरवर्षी पंढरपूरच्या दिशेने पायी वारी जाते तेव्हा पार पडत असतात. परंतु, यावर्षी देखील करोनाचं संकट असल्याने मोजक्याच वारक-यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे. आज सकाळी मुख्य मंदिरात प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी इनामदार वाड्यात टाळ मृदंगाच्या गजरात पोहचली. तिथे पादुकांची आरती करून झाल्यानंतर एस.टी.मध्ये पादुका विसावल्या. तुकोबांचा जयघोष करत ग्यानबा तुकारामाने परिसर दुमदुमून गेला होता. एस.टी.मधून पादुका पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमा झळकण्यासाठी पुढाकार घेणार-सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या