24.2 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeसोलापूरदारूच्या नशेत पत्नीला मारहाण, नवर्‍यावर गुन्हा दाखल

दारूच्या नशेत पत्नीला मारहाण, नवर्‍यावर गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

बार्शी : पत्नी घरी असताना नवरा दारू पिऊन येताच त्यास दारू पिऊन घरी येऊ नका, पिऊन उधारी करू नका, असे पत्नीने म्हटल्याच्या कारणावरून त्याने रागात शिवीगाळ व चुलीतील पेटत्या लाकडाने मारहाण केली. तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना दि. १५ जून रोजी रात्री गाताची वाडी (ता. बार्शी) येथे घडली.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार शीला भोसले या घरी स्वयंपाक करत असताना पती गावातून दारू पिऊन आला. तेव्हा त्यास तुम्ही जास्त दारू पिऊन घरी येऊ नका, अशी विनंती केली. शिवाय दारूची उधारी जास्त करू नका असे सांगितले. तेव्हा पतीला राग आल्याने चुलीतील जळत्या लाकडाने पत्नीच्या अंगावर विविध ठिकाणी मारहाण करून जखमी केले. त्यावेळी मुलगी अमृता सोडविण्यास येताच तिलाही ढकलून दिले. पत्नीला तुला आता जिवंत ठेवणार नाही असे म्हणून मारण्यासाठी जात होता. तेव्हा गावातील लोक जमा होऊन शीला भोसले यांना ग्रामीण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

याबाबत जखमी पत्नी शीला परमेश्वर भोसले (४५, रा. गाताची वाडी, ता. बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे. पती परमेश्वर मल्लिकार्जुन भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या