21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeक्राइमपत्नीला मारहाण; पतीसह तिघांवर गुन्हा

पत्नीला मारहाण; पतीसह तिघांवर गुन्हा

एकमत ऑनलाईन

सांगोला : जनावरे चारायला नेण्याच्या कारणावरून पतीने शिवीगाळ करीत लोखंडी गजाने हातावर, पायावर पाठीवर अन डोक्यात गज मारून पत्नीला गंभीर जखमी केले. तसेच सासू-सासरे यांनाही शिवीगाळ करीत हातपाय मोडण्याची धमकी दिली.

ही घटना २० जुलै रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास सांगोला तालुक्यात राजुरी येथे ही घटना घडली. याबाबत शोभा नामदेव दबडे (रा. राजुरी) हिने केली. फिर्याद दिली असून पोलिसांनी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल केला.

शोभा नामदेव दबडे ही महिला २० जुलै रोजी दुपारी शेजारी राहणाऱ्या सविता हिच्याशी अंगणात बोलत असताना पती नामदेव दबडे याने तिला जनावरे चारायला घेऊन जा म्हणून . सांगितले. ती हो म्हणाली, मात्र त्यावेळी पती नामदेव यांनी तिला वेडेवाकडे बोलून तिच्यावर संशय घेऊ लागला. तिने वाईट वाकडे बोलू नका म्हणताच पतीने तिला शिवीगाळ करून लोखंडी गजाने डोक्यात मारहाण करून दुखापत केली.

दरम्यान तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सासू मालन व सासरे शिवाजी दोघेजण येऊन तुला एवढे ओरडायला काय झाले, तुझी काय खोड जात नाही म्हणत सुनेस शिवीगाळ केली. त्यांनी हातपाय मोडण्याची धमकी दिली.

दरम्यान तिने घडला प्रकार फोनवरून वडिलांना सांगितले. त्यांनी सासरी मुक्कामी येऊन सासू-सासरे व पतीला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी काही ऐकून न घेता उलट तिच्याबद्दल वाईट वाकडे सांगून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. तसेच सासूने तिला घेऊन जावा म्हणाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या