24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeसोलापूरपत्नीच्या पोटात चाकू मारला, पतीवर गुन्हा

पत्नीच्या पोटात चाकू मारला, पतीवर गुन्हा

एकमत ऑनलाईन

मंगळवेढा : जेवणात दूध न वाढल्याचा मनात राग धरून पत्नीच्या पोटात चाकू मारून गंभीर जखमी केले. पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नवरा राहुल विलास मस्के (रा. शरद नगर, मंगळवेढा) याच्याविरुद्ध मंगळवेढा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अलका राहुल मस्के ( वय ३२ राहणार शरद नगर) हिने पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार ३० जून रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या दरम्यान घरात जेवण सुरू होते. आरोपी पती राहुल याने जेवणात दूध का वाढले नाही म्हणत शिवीगाळ सुरू केली.

पत्नीने जेवताना भांडण काढू नका, शांत जेवण करा ? म्हणत असताना राहुलने जवळच पडलेला चाकू घेतला अन तिच्या पोटात डाव्या बाजूला मारून गंभीर जखमी केले. यावेळी अलकाला चक्कर येऊ लागली. मुलगा सार्थक हा तिला घरातून बाहेर घेऊन जात असताना राहुलने त्याला मध्ये पडू नको, अन्यथा तुलाही मारीन अशी दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

जखमी पत्नीने प्रथमत: खासगी रुग्णालयात उपचार घेतली. त्यानंतर माहेर गाठले. माहेरात नातेवाईकांना घडलेला प्रकार कथन केला. घाबरलेल्या विवाहितेने चिडलेल्या नवऱ्याच्या भीतीने आईवडिलांना बोलावून घेऊन पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसात फिर्याद दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या