27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeक्राइमपत्नीचे अनैतिक संबंध,पतीची आत्महत्या

पत्नीचे अनैतिक संबंध,पतीची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

सांगोला : पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून तसेच पत्नी, तिचा प्रियकर व तिच्या भावाने दिलेल्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळुन पतीने राहत्या घरी छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय.

दत्ता सुखदेव शेळके (रा. सांगोला) असे मयताचे नाव आहे. याबाबत मयताचा चुलत भाऊ दादासाहेब शेळके यांनी पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून मयताची पत्नी, आबासाहेब बिरा खरात, दादा ईश्वर धुलगुडे यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सांगोला तालुक्यातील एका गावातील येथील दत्ता सुखदेव शेळके याचे लग्न २०१५ मध्ये झाले होते. १५ दिवसांपूर्वी दत्ता याने भाऊजी व चुलत भाऊ दादासाहेब शेळके यांना भेटून तसेच पत्नीचे गावातील आबासाहेब बिरा खरात नावाच्या युवकासोबत अनैतिक संबंध असून त्या दोघांपासून जीवितास धोका असल्याचे सांगितले होते.

मयताची भावजी अंकुश हांडे यांनी दत्ताच्यासमोर त्याच्या पत्नीला समजावून सांगत असताना माझ्या नवऱ्याने दारू सोडावी, नाहीतर मी माझ्या मनाला वाटेल तसे वागणार असे उलट उत्तर देत ती रागात निघून गेली होती.

या समजावण्यात काही फरक पडला नव्हता. पत्नीचे अनैतिक संबंध वाढत चालल्याने गावात उलट-सुलट चर्चा होत होती. दत्ता जास्तच दारूच्या आहारी गेला होता. त्यानंतर दादा धुलगुडे तसेच आबासाहेब खरात या दोघांनी अचकदाणी फॉरेस्टमध्ये दत्ताला हाताबुक्क्यांनी मारहाण करून तू तुझ्या पत्नीवर संशय घेवू नकोस नाहीतर आम्ही दोघेजण तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली होती.

२३ जुलै रोजी पहाटे ४. ३० च्या सुमारास चुलते ज्ञानेश्वर आबा शेळके यांनी दादासाहेब शेळके यांना फोन करून दत्ता हा घरात बेशुद्ध आहे, त्याने मान टाकली आहे, तू बघायला ये असे सांगितले. दत्ता सुखदेव शेळके यास उपचारासाठी आटपाडी येथील सरकारी दवाखान्यात घेवून गेले. दत्ता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मयत दत्ता यास सांगोला येथील सरकारी दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी तपासून तो गळफास घेतल्याने मयत झाल्याचे सांगितले. याबाबत मयताचा चुलत भाऊ दादासाहेब मारुती शेळके यांनी मयताची पत्नी, आबासो बिरा खरात, दादा ईश्वर धुलगुडे यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या