22.5 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home सोलापूर पोलिसांच्या आर्शिवादाने दारु धंदे जोमात,पोलिस निरक्षीक लक्ष देतील का? नारीकातून चर्चा

पोलिसांच्या आर्शिवादाने दारु धंदे जोमात,पोलिस निरक्षीक लक्ष देतील का? नारीकातून चर्चा

एकमत ऑनलाईन

सांगोला (विकास गंगणे) कोरोनाने अवघ्या जगाला वेढले आहे. जगण्याचा एक अविभाज्य भाग म्हणून आधी कोरोनापासून दूर राहण्याची काळजी प्रत्येकजण घेताना दिसतो आहे. यात समाजातील कोणताच घटक मागे नाही. मात्र सांगोला तालुक्यातील घेरडी परिसरात असे एक गावे आहेत ज्या ठिकाणी गावे बंद ठेवली आहेत ते फक्त नावापुरती शिल्लक राहिली आहे या घेरडी व काही गावात अवैध दारू मोठ्या प्रमाणावर मिळतं आहे.

घेरडी परीसरातील काही गावात जवळजवळ वीस गावातील लोक दारू पिण्यासाठी फक्त आणि फक्त पारे ,डिकसळ गावात येत आहे .आणि हे सर्व घेरडी पोलिसांच्या आशीर्वादाने होत आहे. अवैध धंदे तालुक्यातील गावात विविध भागांत बिनधास्त सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. यावर पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसुन येत आहे.तसेच काही दारुधंदे वाले,घेरडी पोलिसांच्या मर्जितले तुपाशी व काही दारुधंदेवाले उपाशी ? पोलीस निरक्षीकलक्ष देतील का? सुरवातीच्या काळातील बंद अवैध धंदे सध्या सर्रास सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.

विशेष म्हणजे अवैध धंदे करणाऱ्यांना गावात पोलिस कधी येणार याची माहिती हप्ते खोर पोलिसांनी आधीच दिलेली असते . त्या अवैध धंदे दुकानधारकाचे पोलीस अधिकारी,कर्मचारी,राजकीय नेत्यासंह पत्रकारांशीही चांगले संबध असल्याने कुणीही त्याबद्दल बोलत नसल्याची चर्चा आहे.अधिक पैशांचे आमिष दाखवून गोरगरीब जनतेला लुटण्याचा धंदाच घेरडी गावात आसपासच्या खेड्यात जोमात सुरु आहे. सांगोला पोलीस निव्वळ देखाव्याच्या नावावर कारवाई करीत असल्याने यांच्यावर वचक राहिलेला नाही. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन योग्य ती पावले उचलण्याची आज गरज आहे.तरी अवैध दारु विक्रेत्याबाबत प्रशासन दुजाभाव करीत असल्याचे दिसुन येत आहे अशी चर्चा नागरीकामधून होत आहे.

पंढरपुरात कलावंतांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,434FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या