36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeसोलापूरएसटी सुरू झाल्याने प्रवाशांच्या चेह-यावर हास्य तर एस.टी कर्मचा-यांच्या चेह-यावर निराशा

एसटी सुरू झाल्याने प्रवाशांच्या चेह-यावर हास्य तर एस.टी कर्मचा-यांच्या चेह-यावर निराशा

एकमत ऑनलाईन

रजनीश कसबे/मलिकपेठ
एस.टी कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपाला न्याय देणे गरजेचे असताना मायबाप सरकारने न्याय देणे तर सोडाच अन्याय मात्र कायम ठेवलाची प्रतिक्रिया वाहक व चालक यांनी दिली.एसटी कर्मचा-यांनी न्यायालयाचा आदेश मान्य करत कामावर रुजू झाले.एस.टी कर्मचा-यांचा संप संपल्यानंतर लालपरी रस्त्यावर धावू लागली.एस.टी वाहक व चालक यांना मात्र विविध समस्यांना समोर जावे लागत आहे. एक वर्षानंतर एस.टी रस्त्यावर दिसल्याने प्रवाशांच्या चेह-यावर आनंद दिसून आला.मात्र एस.टी वाहक, चालक यांच्या चेह-यावर निराशा कायम राहिल्याचे दिसून आले.

एक वर्षानंतर एस.टी डेपो मधून बाहेर निघाल्यानंतर सतत एस.टी रस्त्यावर बंद पडताना दिसून येत आहे.कसल्याही प्रकारची दुरुस्ती न करता रस्त्यावर उतरल्याने एस.टी चे ब्रेक फेल होणे व विविध समस्याला वाहक,चालक व प्रवाशांना यांचा त्रास सहन करावा लागत आहे,स्क्रॅप झालेल्या एस.टी रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका होऊ शकतो.वाहकाची तिकीट मिशन बंद पडणे,एसटी बंद पडणे.मेकॅनिकल वेळेवर उपस्थित राहत नाही असे प्रकार घडत असताना त्यामध्ये प्रवाशांची सहकार्य करण्याची भूमिका समोर येत नाही.आठ वर्षापासून नवीन एसटींची खरेदी करण्यात आलेली नाही.

ज्येष्ठ नागरिक यांची संख्या एसटी सुरू झाल्यापासून प्रवासामध्ये वाढताना दिसून येत आहे.एस.टी चे कर्मचारी संपावर गेल्यानंतर खाजगी वाहनांना परवानगी दिल्यानंतर प्रवाशांची लूट करण्यामध्ये खाजगी वाहने मागे राहिलेली नाहीत.शिवशाही बस सुरू झाल्यापासून त्या बसला खाजगी चालक आहे.वाहक मात्र एसटी महामंडळाचाा कर्मचारी आहे.याकडेही राज्य सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.लालपरीची(एस.टी)दुरुस्ती करून रस्त्यावर धावण्याची परवानगी देण्यात यावी अन्यथा मोठ्या संकटांना प्रवाशांबरोबर वाहक व चालक यांना जावे लागणार हे निश्चित आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या