22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeसोलापूरखर्डीत तलवार हल्ल्यात महिला जखमी

खर्डीत तलवार हल्ल्यात महिला जखमी

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : अनैतिक संबंधातून झालेल्या वादामध्ये आपल्या मुलावर तलवारीने होत असलेला वार त्याच्या आईने स्वत:वर घेतला, अन् क्षणातच तिच्या हाताचा पंजा तुटून बाजूला पडला. ही धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्यात गुरुवारी सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात ५० वर्षीय महिला जखमी झाली असून आरोपीस जमावाकडून बेदम मारहाण झाली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यात एका गावात संतोष याच्या अनैतिक संबंधावरून गुरुवारी सकाळी संतोष व कांबळे कुटुंबात वाद निर्माण झाला. यावेळी रामदास कांबळे याने आपल्या बरोबर कुन्हाड तर साथीदाराने तलवार आणली होती. भांडणामध्ये रामदास याने तलवारीने संतोष याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी जवळच उभी असलेली संतोषची आई यांनी मुलाचा जीव वाचविण्यासाठी त्याच्या पुढे आपला हात घातला. रामदास याने जोरदार वार केल्याने मातेचा हाताचा पंजाच तुटून पडला.

यावेळी घटनास्थळी अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता. रणदिवे यांच्या कुटुंबीयाने तातडीने जखमी महिलेला पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तर आरोपी रामदास कांबळे याला उपस्थितांनी चांगलाच चोप दिल्याने जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करावे लागले. घटनेची माहिती मिळताच पो.नि. मिलिंद पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी सीताराम कांबळे, रामदास कांबळे, हरिदास कांबळे व संतोष यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आले असून पुढील तपास स.पो.नि. आदिनाथ खरात करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या