18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeसोलापूरवाहनाच्या धडकेत महिला ठार

वाहनाच्या धडकेत महिला ठार

एकमत ऑनलाईन

बार्शी : वाशी तालुक्यात तेरखेडा येथून घरगुती किराणा बाजार खरेदी करून आईसमवेत दुचाकीवरून निघालेला मुलगा लघुशंकेसाठी थांबला. मोटारसायकल लावून तो रस्त्याखाली उतरला. इतक्यात भरधाव वेगात निघालेल्या मोटारसायकलने दुचाकीच्या बाजूला थांबलेल्या मातेला जोरात धडक दिली. या अपघातात ती माता गंभीर जखमी होऊन मरण पावली.

ऊर्मिला कदम (वय ४३, रा. कळंबवाडी आ. ता. बार्शी) असे जखमी होऊन मरण पावलेल्या मातेचे नाव असून याबाबत मुलगा सुभाष कदम (वय २२, रा. कळंबवाडी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, फिर्यादी सुभाष कदम हा ४ नोव्हेंबर रोजी आईला दुचाकीवर घेऊन दुपारी तेरखेडा येथे किराणा खरेदीसाठी घेऊन गेला होता. साहित्य खरेदीनंतर तो सांयकाळी ६ च्या सुमारास गावाकडे परत निघाला. काटेगावच्या माळावर येताच तो लघुशंकेसाठी थांबला. रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून गेला. दरम्यान आई ऊर्मिला या मोटारसायकलच्या बाजूला थांबलेल्या होत्या.ईतक्यात त्यांना समोरून येर्णा­या भरधाव मोटारसायकल (एम.एच.१३/ डी. आर. १७८५)ची जोरात धडक बसली, या अपघातात ऊर्मिला यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्या रक्तबंबाळ झाल्या.

या अपघातादरम्यान मुलगा सुभाष याने त्या मोटारसायकलस्वाराचे नाव विचारताच त्याने नाव सांगितले. त्यानंतर मुलाने ही घटना तत्काळ वडिलांना कळविली. त्यांनी येऊन तेथून बार्शीतील खासगी दवाखान्यात उपचारास दाखल केले. उपचार सुरू असताना ५ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. विधी संपताच मुलगा सुभाष याने १० नोव्हेंबर रोजी पोलिसात फिर्याद दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या