22.9 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeसोलापूरचुप बैठने का हिलने का नहीं, तुम्हारे पास पैसा है, तुम हिले...

चुप बैठने का हिलने का नहीं, तुम्हारे पास पैसा है, तुम हिले तो बुड्ढी को मार देंगे

एकमत ऑनलाईन

बार्शी : ‘चुप बैठने का हिलने का नहीं,तुम्हारे पास पैसा है,तुम हिले तो बुड्ढी को मार देंगे’ हे वाचून तुम्हाला कुठल्यातरी पिक्चरचा डायलॉग वाटेल पण ही धमकी आहे.असे धमकावून निवृत्त मुख्याध्यापकाच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकून साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला आहे.बार्शी शहातील वाणी प्लॉट येथे रात्री 2 वाजता चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला.शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरींच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे.अधिक माहिती अशी की वाणी प्लॉट येथे राहणारे निवृत्त मुख्याध्यापक गजेंद्र गेना जाधव वय-68 वर्षे यांच्या घरी 4 लाख 31 हजार दगिन्यांची चोरी झाली आहे.

हकीकत अशी की वाणी प्लॉट येथील दोन मजली निवासस्थानी गजेंद्र जाधव हे पत्नी,दोन मुले आणि दोन सुना असा एकत्र परिवार राहत आहेत.दि.13 जून रोजी जेवण करून सर्वजन रात्री 11 वा.सुमारास झोपी गेले.गजेंद्र आणि त्यांची पत्नी हे हॉलमध्ये झोपले होते.त्यांचा मुलगा सुनील व सून अश्विनी या हॉल शेजारील बेडरूममध्ये झोपल्या होत्या.दुसरा मुलगा अनिल व सुन सुषमा या पहिल्या मजल्यावर बेडरूममध्ये झोपल्या होत्या.रात्री 2 वाजता गजेंद्र यांची झोपमोड झाल्याने उठले व झिरो बल्ब लावला असता घराच्या हॉलमध्ये दोन इसम एकाच्या हातात लाकडी दांडा व चाकू तर एकाच्या हातात लाईटचा टॉर्च होता.

पत्नी उशाही आवाजाने उठली तेंव्हा त्यांच्याजवळ इसम लाकडी दांडके घेऊन थांबला तर दोघेजण हॉलमधील कपाटाजवळ उभे होते.हॉलमध्ये एकूण 5 इसम अंदाजे 20 ते 25 वयोगटातील तोंडाला रुमाल बांधलेले होते.गजेंद्र जाधव यांच्याजवळ उभ्या असलेल्या एका चोराने चाकू दाखवला व दांडके उगारून ह्ल चुप बैठने का हिलने का नहीं,तुम्हारे पास पैसा है,तुम हिले तो बुड्ढी को मार देंगे.ह्व असे म्हणून गजेंद्र यांना धमकावले व त्यांच्या पायावर दांडके मारले.त्यामुळे ते दिवाणवर झोपून राहिले.त्यानंतर कपाटाजवळ उभे असलेल्या दोघांनी कपाटाचा दरवाजा तोडून त्यातील सोन्याचे दागिने,रोख रक्कम आणि जाधव यांचा फोन घेऊन पसार झाले.त्यानंतर गजेंद्र यांनी दोन्ही मुलांना उठवन्यासाठी गेले असता त्यांच्या बेडरूमला बाहेरून कडी लावल्याचे दिसले.

त्यांना उठवून गजेंद्र यांनी सर्व हकीकत सांगतली.त्यातील मुलगा अनिल याने पोलिस स्टेशनला फोन करून सर्व हकीकत सांगितली असता पोलिस लागलीच हजर झाले व बार्शी शहर पोलिस ठाण्यात भादवि कलम -395 प्रमाणे 5 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि ज्ञानेश्वर उदार करीत आहेत.

मुसळधार पावसाने सखल भागातील घरात शिरले पाणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या