23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeसोलापूरघरच्यापेक्षाही चांगलं जेवण मिळतयं

घरच्यापेक्षाही चांगलं जेवण मिळतयं

एकमत ऑनलाईन

सोलापूर : जेवण चांगलं मिळतंय का….वेळेवर साफ-सफाई होते का….उपचार व्यवस्थित मिळतात का….हो घरच्यापेक्षा जेवण चांगलं आहे….इथं चांगली काळजी घेतली जात आहे…..हा संवाद आहे बार्शीतील छत्रपती शिवाजी महाविद्यालय पॉलिटेक्निक कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमधील पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि कोरोना रुग्णांमधील.

यावेळी आमदार यशवंत माने, जिल्हाधिकारी मिंिलद शंभरकर, प्रांताधिकारी हेमंत निकम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अंकित, तहसीलदार डी.एस. कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शिवाजी गवळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जोगदंड आदी उपस्थित होते.

श्री. भरणे यांनी रविवारी सायंकाळी बार्शीतील कोविड केअर सेंटरला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली, रुग्णांकडून माहिती घेतली. आपल्याला कोरोनाला हरवायचं आहे. शासन आपल्यासाठी सर्वतोपरी मदत करीत आहे.
तुम्ही बरे होताय, काळजी करू नका. मनोधैर्य वाढवा, खचू नका, असेच हसत खेळत रहा, घाबरू नका, अशा शब्दात श्री. भरणे यांनी रूग्णांना धीर दिला.

बार्शीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह, छत्रपती शिवाजी महाविद्यालय वसतिगृह, छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे पॉलिटेक्निक कॉलेज याठिकाणी चार तर वैरागमध्ये श्रीसाई आयुर्वेदिक महाविद्यालयात कोविड केअर सेंटर आहेत. याठिकाणी असणा-या त्रुटींची त्वरित पूर्तता करण्याच्या सूचना त्यांनी अधिका-यांना केल्या.

लॉकडाऊन तुमच्या आरोग्यासाठीच
शासन आणि प्रशासनाला लॉकडाऊन करण्यात आनंद नाही. तालुक्यातील रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आपल्याला रूग्ण कमी करायचे आहेत. प्रत्येकाच्या आरोग्यासाठी आणि जीविताचा धोका टाळण्यासाठी हा लॉकडाऊन आहे. प्रशासनाला सहकार्य करा, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा, सुरक्षित अंतर ठेवा, हात साबणाने धुवा, असे आवाहनही श्री. भरणे यांनी केले.

Read More  विजयदुर्ग किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी केंद्र शासनाने परवानगी द्यावी – अमित देशमुख

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या