सोलापूर : अज्ञात कारणावरून तीन जणांनी मिळून तरुणाला बांबूने मारहाण केल्यामुळे तरुण जखमी झाला आहे. नागेश अंबादास जाधव (वय ३३, रा. लक्ष्मी मार्केट जवळ, झुंजे बोळ, दक्षिण कसबा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी नागेश जाधव हे शनिवार ४ जून रोजी आपल्या घराकडे जात असताना आरोपी संदीप जकनाईक याने जाधव याला पाहून शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर फिर्यादी हे घरी जाऊन थोड्या वेळाने तेथूनच कामाला जाण्यासाठी बाहेर पडल्यानंतर आरोपी संदीप जकनाईक, सागर जकनाईक, गंगा जकनाईक (सर्व रा. दक्षिण कसब लक्ष्मी मार्केट, झुंजे बोळ) यांनी तिघांनी मिळून फिर्यादीस मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी फिर्यादी जाधव यांचे आई व भाऊ भांडण सोडवण्यासाठी आल्यानंतर गंगा जकनाईक यांनी बांबूने मारहाण करून केल्यामुळे जाधव यांच्या आईच्या तोंडाला जखम झाली. तसेच फिर्यादीचा भाऊ ही जखमी झाला आहे. याप्रकरणी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास फौजदार चावडी पोलीस करत आहेत.