25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeसोलापूरफेसबुकवर पोस्ट लिहून बार्शीत तरुणाची आत्महत्या

फेसबुकवर पोस्ट लिहून बार्शीत तरुणाची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

बार्शी : बार्शी शहर व तालुक्यात सध्या आत्महत्या हाचिंतेचा विषय बनला आहे.मागील काही दिवसांपासून तालुक्यात आत्महत्येचे सत्रच सुरु आहे.त्यातच रविवार दि.२९ नोव्हेंबर रोजी बार्शी शहरातील पाटील प्लॉट येथील मंगेश अशोक भाकरे वय वर्षे-३६ या तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे पुढे आलेय. मंगेशने दोन दिवसापूर्वी माझ्याकडून काही चूक झाली असेलतर मला माफ करा अशी फेसबुकवर पोस्ट लिहून विषारी औषध प्राशन केले होते.

त्यानंतर मंगेशला उपचारासाठी बार्शीतील डॉ.कर्मवीर मामासाहेब जगदाळे या हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले होते.मात्र मंगेशने उपचाराला साथ न दिल्यामुळे त्याचा हॉस्पिटलमध्ये मृत्यु झाला.मंगेशच्या पश्चात पत्नी, एक बहिण,एक मुलगी,एक मुलगा असा परिवार आहे.मंगेशने यापूर्वी देखील दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता परंतू मंगेश त्यातून बालंबाल बचावला होता.दरम्यान अलीपुर रोड या भागातील जमिनीचा व्यवहार पूर्ण न झाल्यामुळे देखील मंगेश नैराश्येत असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी आत्महत्या आलेल्या संकाटातून मुक्त होण्याचा मार्ग नाही.

त्यामुळे तरुणांमध्ये योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना त्यापासून परावृत्त कसे करता येईल यासाठी व्याख्याते आणि स्मार्ट अ‍ॅकॅडमीचे संचालक सचिन वायकुळे यांनी शहरातील राजकिय,सामाजिक क्षेत्रात काम करणा-या युवकांची बैठक सोमवार दि.३० नोव्हेंबर रोजी स्मार्ट अ‍ॅकॅडमी येथे सायंकाळी ५ वा. बोलावली आहे.
या बैठकीमध्ये वायकुळे हे तरुणांमध्ये येणारे नैराश्य आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी केले जाणारे प्रयत्न याविषयी बोलणार आहेत.कारण गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील आत्महत्येची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहिये.याला तसे पहायला गेलेतर लॉकडाऊनमुळे बंद पडलेल्या व्यवसायातून आलेले नैराश्य,सावकारांचे कर्ज आणि त्यातून सोशल स्टेटस जपण्याची धडपड यातूनही तालुक्यात मोठ्या प्रमाणात आत्महत्येत वाढ होत आहे.त्यामुळे हे सत्र थांबण्यासाठी आता सामाजिक भान असणा-या तरुणांनीच पुढे येणे गरजेचे आहे.

बार्शी शहरातील तरुणांच्या आत्महत्येत होणारी वाढ हाचिंतेचा विषय आहे.ही मालिका कुठेतरी थांबली पाहिजे.यासाठी आम्ही स्मार्ट अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून युवकांमध्ये प्रबोधन घडवून त्यांना आत्महत्येपासून कसे रोकता येईल यासाठी सोमवार दि.३० नोव्हेंबर रोजी स्मार्ट अ‍ॅकॅडमी येथे सायंकाळी ५ वा.बैठक बोलावली आहे.यात युवकांबरोबर सामाजिक,राजकीय क्षेत्रात काम करणा-या मंडळींनीही युवकांना मार्गदर्शन करावे असे अवाहन अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
– सचिन वायकुळे
(संचालक-स्मार्ट अ‍ॅकॅडमी)

आता ‘पीयूसी’ नसल्यास वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र जप्त होणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या