सोलापूर : सोलापूर-पुणे रोडवरील मोहोळ शहरानजीक बंद असलेल्या एका हॉटेलमध्ये हॉटेल कामगाराने लॉकडाऊनच्या काळात गावाकडे जाण्याची सोय झाली नाही तर येथे खाण्यापिण्याची ही सोय झाली नाही म्हणून बंद असलेल्या हॉटेलच्या किचनमध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना रविवार ३० ऑगस्ट रोजी उघडकीस आली. मागील दोन-अडीच महिन्यापासून मृतदेह लटकत राहिल्याने आपोआप त्याचे मुंडके गळून बाजूला पडल्याचे दिसून आले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील कन्या प्रशाला चौकातील हॉटेल रुची हे लॉकडाऊन सुरु झाल्यापासून बंद होते. हॉटेलच्या मूळ मालकाने हे हॉटेल तर दोघांना चालविण्यास दिले होते. २४ मार्चपासून लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद होते. या हॉटेलात तिघे कामगार परराज्यातील होते. परंतु गावाकडे जाण्यासाठी दोन कामगारांना पास मिळाला. एकाच पास न मिळाल्याने तो हॉटेलमध्येच राहिला होता.
लॉकडाऊनच्या काळात काही दिवस त्याने मिळेल त्या जेवणावर काढले. त्यानंतर खाण्यापिण्याची सोय झाली नाही म्हणून त्याने वैतागून हॉटेलच्या किचनमध्येच अँगलला साडी बांधून गळफास घेतला. ही घटना ३० ऑगस्ट रोजी सकाळी आसपासच्या नागरिकांनी दुर्गंधीयेत असल्याची माहिती पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसघटनास्थळी गेले असता हा प्रकार उघडकीस आला असून त्यांच्या जवळ सापडलेल्या कागदपत्रावरून त्याची ओळख पटली आहे.
त्याचे नाव कुलदिपसिंग सोलसिंग मरावी असे असून तो मध्यप्रदेशचा रहिवासी असल्याचे उघढ झाले आहे. याबाबत पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक बी. आर. बाडीवाले, ढाकणे, व्ही. जी. माने, ए. जी. बोरकर, ए. ई. जाधव तपास करीत आहेत.
कोरोनावर मात करून आ.दुर्राणींचा पाथरीत प्रवेश